माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहूल आवाडे यांचे होत आहे अभिनंद
सुभाष भस्मे / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी शहरात वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर आता नियंत्रण मिळाले आहे — आणि त्याचे श्रेय जाते पंचगंगा नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या ‘यशोदा पूला’ला!
हा पूल माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे व आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या फंडातून बांधण्यात आला असून, यामुळे पूराचे पाणी आता शेळके मळा, जुना चंदूर रोड, कागवाडे मळा, नदीवेश नाका, तोडकर मळा आणि गावभागात साचण्याऐवजी वाहून जात आहे.
सदर पुलामुळे पूराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला असून
शहरवासीयांचा दैनंदिन त्रास टळला आहे,या जनहितकारी कामासाठी
माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे व डॉ. राहुल आवाडे यांचे शहरवासीयांतून विशेषतः पुराचा त्रास सहन करावा लागणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांतून अभिनंदन केले जात आहे.
