Spread the love

राज्य महिला आयाेगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची ग्वाही

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा

विद्यार्थीनी, युवती आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील महायुतीचे सरकार कटीबद्ध असुन काेणत्याही आपत्कालीन परिस्थितीत संरक्षण करण्यासाठी निर्भया पथक 24 तास कार्यरत आहे. विद्यार्थीनी, युवती आणि महिलांनी निर्भयपणे 1098 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राज्य महिला आयाेगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सक्षम तु अभियान अंतर्गत रुपाली चाकणकर यांनी विद्यार्थीर्ंनी व महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर उपस्थित विद्यार्थी, महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी निर्भया पथकाच्या पाेलीस उपनिरीक्षक किशाेरी साबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना निर्भया पथकाचे काम चित्रिफतीद्वारे दाखवुन विविध उदाहरणासह प्रात्यक्षिकेही सादर केली. यावेळी काेल्हापुर जिल्हा महिला अध्यक्षा शितल फराकटे, शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे, माजी आमदार अशाेकराव जांभळे, अमित गाताडे, लतिफ गैबान, परवेज गैबान, नासीर अपराध यांच्यासह मान्यवर उपस्थित हाेते. कार्यक्रमास शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थीनी, युवती, महिला उपस्थित हाेते.