Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मुदत मंगळवारपर्यंत म्हणजेच आज संपणार आहे. अशातच कृषिमंत्र्याच्या राजीनाम्याबाबत आज निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून कृषीमंत्री कोकाटे हे वारंवार ‘सेल्फ गोल’ करत असल्याने त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये माणिकराव कोकाटे यांची कृषीमंत्रिपदावरुन उचलबांगडी व्हावी असा वाढता दाबावे लक्ष्यात घेता माणिकराव कोकाटे हे आज अजित पवारांची भेट घेण्यासाठी आले आहेत. गेल्या 15 मिनिटांहून अधिक काळ या दोघामध्ये चर्चा होतेय.  या चर्चा अंतीच निर्णय होण्याची शक्यता आहे. 

अशातच, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा नको, असे म्हणत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी अजित पवारांनी उत्तर देत सांगितले कि, आपण किती वेळा चुका करणार आणि किती वेळा माफ करायचं? असा प्रतिसवाल या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अजित दादांनी केला. यावरून कृषिमंत्री कोकाटेंचा राजीनामा घेतल्या जाण्याचे आता अजित दादांकडून स्पष्ट संकेतच देण्यात आले आहे. आता राजीनामा नको म्हणून आपण आलात, मात्र ज्यावेळी मी स्वत:हून मंत्रिपद दिलं त्यावेळी कुणीही का आलं नव्हतं? असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.  सतत चुका होतं असल्यामुळे आता माफी नाही, अशी स्पष्ट भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

माणिकराव कोकाटे यांची झाल्या प्रकाराबाबत अजित पवारांकडे दिलगिरी?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचा विरोध पक्षाला परवडणारा नाही, असे पक्षातल्या काही नेत्यांचे मत आहे. अशातच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज सकाळी भेट झाली. आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीपूर्वी हि भेट झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांनी झाल्या प्रकाराबाबत अजित पवारांकडे दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती आहे. तर कृषिमंत्री कोकाटे यांच्याकडून पुढील काळात अशा बाबी घडणार नसल्याच अजित पवारांना आश्वासन देण्यात आल्याचे हि विश्वसनीय सुत्रांकडून समजतंय. आता माणिकराव कोकाटे यांच्याबाबत सर्वस्वी निर्णय अजित पवार जाहीर करणार असल्याची शक्यता आहे.