हातकणंगले / महान कार्य वृत्तसेवा
संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडे प्रवेश करण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांची धडपड सुरू आहे. अशातच चंदुरचे सुपुत्र सचिन हळदे यांची चंदुर शिवसेना शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली व आत्मजित लोखंडे यांची हातकणंगले तालुका उपप्रमुखपदी तर सागर माळी यांची चंदुर शहर सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
यामुळे शिवसेना शिंदे गटासाठी चंदुर गावातून कर्तुत्वान चांगले चेहरे मिळाल्याचे दिसत आहे. सचिन हळदे व आत्मजित लोखंडे यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड आहे. गावामध्ये यापूर्वी त्यांनी विविध सामाजिक संस्थांच्या व फायटर्स ग्रुपच्या माध्यमातून भरपूर सामाजिक कार्य केले आहे. सचिन हळदे यांच्या पत्नी सौ.योगिता हळदे चंदुर ग्रामपंचायतमध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्या म्हणून कार्यरत आहेत. शिवसेना शिंदे गट वाढीसाठी चंदुर गावातून चांगले युवा नेते मिळाले आहेत. त्यामुळे पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, आमदार अशोक माने(बापू), जिल्हाध्यक्ष रवींद्र माने, इचलकरंजी शहराध्यक्ष भाऊसो आवळे, हातकणंगले पंचायत समिती माजी सदस्य राजेंद्र शिंदे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
पत्र मिळताच सचिन हळदे व आत्मजित लोखंडे यांनी आपण आजवर केलेल्या सामाजिक कार्याची दखल “शिवसेना” पक्षाकडून घेण्यात आली आहे. त्यासाठी आपण शिवसेना पक्ष वाढीसाठी व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार व शिकवण यांचा प्रचार प्रसार करणार असल्याचे सांगितले व कोणतेही गट तट न पाहता शिवसेना पक्ष वाढीसाठी कार्यरत राहणार असे मत व्यक्त केले. यावेळी चंदुर येथील खासदार धैर्यशील दादा प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
