Spread the love

पुलाची शिरोली/ महान कार्य वृत्तसेवा

पुलाची शिरोली येथील युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना सकाळी नऊ च्या सुमारास घडली आहे. नवजीत महादेव मोंगले ( वय २४ रा. सोडगे माळवाडी, पूलाची शिरोली, ता. हातकणंगले ) असे त्या युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, नवजीत हा सकाळी शेतातून वैरण घेऊन आला होता.त्यानंतर डेअरीत दूध घालून आला असता सर्विसिंग सेंटरवर हातपाय धुण्यासाठी मोटार चालू केली असता मोटारीची वायर कट झालेल्या ठिकाणी त्याचा स्पर्श होऊन विजेच्या जोरदार धक्क्याने जागीच मृत्यू झाला. सहा महिन्यापूर्वीच नवज्योतचे लग्न झाले होते. नोकरीऐवजी आपला व्यवसाय बरा म्हणून त्याने चार वर्षांपूर्वी भावाच्या मदतीने ज्योतिर्लिंग सर्व्हिसिंग सेंटर सुरू केले होते. या व्यवसायात त्याने चांगला जम बसवला होता. नवजीत हा मनमिळाऊ स्वभावाचा होता.त्यामुळे आज अशा उमदया तरुणाचा मृत्यू झाल्याने शिरोली सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटना समजताच आजूबाजूच्या व घरच्या लोकांनी तात्काळ धाव घेतली. यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूर येथील सरकारी इस्पितळात पाठविण्यात आला. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे . या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.