रोटरी क्लब सेंट्रलतर्फे शाहूनगर येथे वृक्षारोपण
हातकणंगले / महान कार्य वृत्तसेवा
वृक्षलागवड येत्या पिढीसाठी काळाची गरज आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षलागवड हाच प्रभावी उपाय आहे. आज लावलेली झाडे उद्याच्या पिढीच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरणार आहेत. प्रत्येकाने एक झाड लावून त्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ हातकणंगले सेंट्रलचे नूतन अध्यक्ष नूर शेख यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ हातकणंगले सेंट्रल आणि इचलकरंजी एक्झिक्युटिव्हतर्फे शाहूनगर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी विविध वृक्षांचे वृक्षारोपण केले. सेंट्रलचे सेक्रेटरी अनिल पाटील, खजिनदार प्रवीण बेडक्याळे, संजय मेटे दोन्ही रोटरी क्लबचे सदस्य योगेश पांडव, विजय वसगडे आदी उपस्थित होते.
