मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आल्यानंतर मनसे आणि ठाकरे गट यांच्यातील अंतर कमी होताना दिसत आहे. महापालिकेच्या निमित्ताने युतीबाबत अजून काही ठरलं नाही, असं सांगितलं जात असलं तरी राजकीय अर्थ काही लपून राहिला नाही. अशातच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आल्याचं दिसून आलं. कारण होतं, उद्धव ठाकरे यांचा 65 वा वाढदिवस… उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी मातोश्रीवर पाऊल ठेवलं अनब नव्या राजकीय चर्चांचा सुगावा दिला आहे. मात्र, राज ठाकरेंच्या पोस्टने चर्चांना उधाण आलंय.
राज ठाकरेंची सोशल मीडिया पोस्ट
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची याची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत गेले अनब अभिवादन केलं. दोन्ही भावांच्या भेटीनंतर राज यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली अनब राज उद्धव आणि बाळासाहेब ठाकरे यांचा एकत्रित फोटो शेअर केला. त्यावेळी राज ठाकरे यांनी एका वाक्यात अनेक धनुष्यबाणाचे तिर सोडल्याची चर्चा आहे.
राज ठाकरे पोस्टमध्ये काय म्हणाले?
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या, अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरेंच्या या एका वाक्यात अनेक अर्थांची कलाकारी केली, अशी चर्चा आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा केल्याने आता राजकीय वतुर्ळात चर्चांना उधाण आल्याचं पहायला मिळत आहे.
दरम्यान, राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांचं स्वागत केलं. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरें याची गळाभेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राज ठाकरे मातोश्रीवर 20 मिनिटं होते. यावेळी अविनाथ अभ्यंकर, नितीश सरदेसाई, संजय राऊत, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या फोटोमध्ये एकत्र दिसून आले.
