Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

राज्यात पुन्हा एकदा फोन टॅपिंगचं प्रकरण चर्चेत आलंय. आता तर चक्क राज्यातील मंत्र्यांचेच फोन टॅप होत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधलाय आणि दावा केला आहे की, महाराष्ट्र सरकारच्या काही मंत्र्यांनी त्यांचे फोन टॅप केले जात आहेत या भीतीनं फोन बंद केले आहेत.

अजित पवारांचं प्रत्युत्तर : रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. ”आरोप करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण, अशा आरोपांना पुष्टी देणारे पुरावेही त्यांनी द्यावेत. महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांवर ते हे आरोप कोणत्या आधारावर करत आहेत?” असा सवाल करत अजित पवार यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

रोहित पवारांचा दावा : रोहित पवार यांनी शुक्रवारी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी लिहिलं की, ”काही मंत्र्यांचे फोन नंबर उपलब्ध नाहीत. टॅपिंगच्या भीतीने त्यांनी त्यांचे फोन बंद केले आहेत.” काही मंत्र्यांना काढून टाकून मंत्रिमंडळात फेरबदल केला जाऊ शकतो, असा दावा शिवसेना यूबीटीने काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर लगेच रोहित पवार यांनी फोन टॅपिंगचा दावा केलाय.