स्मशानभूमीत गांजाचा धूर ; पोलिसांचा आशीर्वाद
रुकडी/महान कार्य वृत्तसेवा
हातकणंगले तालुक्यातील माणगाव या पवित्र भूमीत पोलिसांच्या आशीर्वादाने अवैद्य व्यावसायिकांनी आणि त्याचं सेवन करणाऱ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. यांच्या बेकायदेशीर व्यवसायातून जीवन यात्रेचा शेवटचा प्रवास असलेली स्मशानभूमी ही सुटलेली नाही.
माणगाव या ऐतिहासिक गावामध्ये अल्पवयीन मुले गांजा चरस व ड्रग्स चे आहारी, अनेक अल्पवयीन मुले गावात असणाऱ्या स्मशानभूमीमध्ये तसेच तलावाशेजारी असणाऱ्या रिकाम्या जागेत आणि अंधाराच्या ठिकाणी बसून गांजा चरस व नशेली औषधे घेऊन नशा करत आहेत. या ऐतिहासिक गावामध्ये ग्रामपंचायतीने अनेक पुरस्कार मिळवले आहेत अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविल्या आहेत. मात्र गावचे भवितव्य असणारी लहान मुले आज नशा करून गावामध्ये सुसाट गाड्या पळवत आहेत. याबाबत गावातील ज्येष्ठ नेते मंडळी, पोलीस पाटील, पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे, वेळीच पोलीस प्रशासनाने नशेच्या गोळ्या, गांजा, चरस ,कुठून येतो याचा तपास करून वेळीच बंदोबस्त जर केला नाही. तर माणगाव गावातील अनेक तरुण मुले व्यसनाधीन होऊन मृत्युमुखी पावण्याची शक्यता आहे.
गावात एकही परवानाधारक दारूचे दुकान नसताना गावामध्ये पोलीस यंत्रणेच्या कृपेने अनेक अवैध दारू विक्रेते रासरोसपणे दारू विक्री करत आहेत.
पान टपरीतून नशिल्या पदार्थांची रास रोस विक्री
अनेक ठिकाणी गावातील अनेक पानपट्टी टपरीमध्ये प्रचंड प्रमाणात नशिला मावा तयार होऊन त्या माव्याच्या माध्यमातून तरुण मुले नशा करत आहेत, याकडे पोलीस प्रशासन हेतू पुरस्कर दुर्लक्ष करत असून यामागे पोलीस प्रशासनाला महिन्याला हप्ता जात असल्यामुळेच पोलीस दुर्लक्ष करत आहेत अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
