आईचं बोट धरून आकाडी जेवणाच्या कार्यक्रमात गेलेल्या चिमुकलीसोबत नको ते घडलं !
सातारा / महान कार्य वृत्तसेवा
सातारा जिल्ह्यातील कराडमधून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे . आकाडी जेवणाच्या कार्यक्रमात आईसोबत गेलेल्या अवघ्या 4.5 वर्षांच्या मुलीवर 18 वर्षीय युवकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे . याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी तरुणाला तातडीने अटक केली असून पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
नेमकं घडलं काय ?
सातारा जिल्ह्यातील कराड पोलीस ठाण्याच्या हद्दीत लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे . कराड शहरात आघाडी जेवणाच्या कार्यक्रमात आई सोबत गेलेल्या चिमुकलीवर अठरा वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात लैंगिक अत्याचार केला .पीडित मुलगी घाबरलेली असून तिच्या आईने घडल्या घटनेची तक्रार केल्यानंतर कराड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रात्री उशिरा आरोपीला अटक केली आहे .आरोपीवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे .नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असून अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पालकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
चार वर्षांची चिमुकली आईचं बोट धरून आकाडी जेवणाच्या कार्यक्रमात गेली होती. पण तिथे तिच्यासोबत जे घडलं, त्यामुळं संपूर्ण जिल्हा हादरलाय. कराड शहरातील एका 18 वर्षीय तरुणाने या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
नराधमाचं विकृत कृत्य
मुलीची आई एका धार्मिक कार्यक्रमासाठी आयोजित आकाडी जेवणाच्या ठिकाणी मदतीसाठी गेली होती. तिच्यासोबत ती चिमुकलीदेखील होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी असताना, 18 वर्षीय युवकाने चिमुकलीला आमिष दाखवून आपल्या घरी नेलं आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला.घटनेनंतर घाबरलेली चिमुरडी आईजवळ गेली आणि घडलेला प्रकार सांगितला. तिने तात्काळ कराड शहर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तत्काळ कारवाई करत रात्री उशिरा आरोपीला अटक केली. आरोपीविरुद्ध पोक्सो कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
