मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
2006 साली झालेल्या मुंबई लोकल बॉम्ब स्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. या प्रकरणातील 12 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2006 साली झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटाने संपूर्ण मुंबई हादरली होती. मुंबईकरांची लाइफ लाइन असलेल्या मुंबई लोकलच्या आणि माणसांचा चिंधड्या उडाल्या होत्या. 2006च्या आधी 1993 साली देखील मुंबईत अशाच प्रकारे बॉम्ब स्फोट झाले होते. ज्यात बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचं नाव आलं होतं. संजय दत्तने त्यावेळी सांगितलं असतं तर मुंबईत धमाके झाले नसते असा खुलासा प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी केला आहे.
विशेष सरकारी वकील आणि राज्यसभेचे नामांकित सदस्य उज्ज्वल निकम यांनी अलीकडील एका मुलाखतीमध्ये 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणासंदर्भात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्याबाबत एक खळबळजनक खुलासा केले होते. उज्जव निकम म्हणाले होते, ”जर संजय दत्तने वेळेवर पोलिसांना माहिती दिली असती तर 12 मार्च 1993 रोजी मुंबईत झालेला बॉम्बस्फोट टाळता आला असता आणि 267 लोकांचा जीव वाचला असता.”
उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, ”अबू सलेम बॉम्बस्फोटाच्या आदल्या दिवशी संजय दत्तच्या घरी शस्त्रांनी भरलेली व्हॅन घेऊन आला होता. या व्हॅनमध्ये हँडग्रेनेड्स, बंदुका आणि एके-47 होत्या. संजयने एके-47 स्वत:कडे ठेवली आणि उरलेली शस्त्रे परत दिली.” पण जर संजयने त्यावेळेस हे सगळं पोलिसांना सांगितलं असतं, तर तपास सुरू झाला असता आणि मोठा दहशतवादी हल्ला रोखता आला असता”.
संजय दत्तला याप्रकरणात ऊअऊअ कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. पण न्यायालयाने त्याला फक्त शस्त्रास्त्र कायद्यानुसार दोषी ठरवलं आणि 5 वर्षांची शिक्षा सुनावली. ही शिक्षा त्याने पुण्यातील येरवडा तुरुंगात पूर्ण केली. 2016 मध्ये त्याची सुटका झाली.
निकम यांनी सांगितले की, निकालावेळी संजय दत्तचा चेहरा थरथरत होता. ते म्हणाले, ”’मी त्याला म्हटलं, संजय असे करू नकोस. मीडिया तुला पाहतेय. तू अभिनेता आहेस. घाबरलेला चेहरा लोकांना चुकीचा संदेश देईल.’ संजयने फक्त ‘हो सर, हो सर’ एवढंच उत्तर दिलं आणि गप्प बसून निघून गेला. निकम म्हणाले, ”संजय दत्त कायद्याच्या दृष्टीने दोषी आहे. पण तो खरं तर एक सामान्य माणूस आहे. त्याला फक्त शस्त्रांची आवड होती. त्याच्याकडे एके-47 होती, पण त्याने ती कधीही वापरली नाही.”
