मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
इंग्लंडविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या चौथ्या टेस्ट मॅचपूर्वी भारतीय टीमला खेळाडूंच्या दुखापतींनी घेरले असताना, ऋषभ पंतच्या फिटनेसबाबत सकारात्मक अपडेट्स येत आहेत. मात्र, ऋषभ दुखापग्रस्त असताना त्याला खेळवणं धोक्याचं ठरू शकतं. या परिस्थितीतही अनुभवी बॅट्समन श्रेयस अय्यरला चौथ्या टेस्ट मॅचच्या स्क्वॉडमध्ये का स्थान मिळालं नाही, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून विचारला जात आहे.
ऋषभ पंत खेळणार की नाही?
तिसऱ्या टेस्ट मॅचदरम्यान ऋषभ पंतच्या बोटाला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला विकेटकीपिंग करता आली नव्हती. मात्र, टीम इंडियाचे असिस्टंट कोच रायन टेन डोसचे आणि कॅप्टन शुभमन गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंत चौथ्या टेस्ट मॅचसाठी बॅटिंगसाठी पूर्णपणे फिट आहे. तो मॅच खेळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, परंतु त्याला विकेटकीपिंगची जबाबदारी दिली जाणार नाही.
अय्यरला संधी कधी मिळणार?
अशातच आता टीम इंडियामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असताना आणि दोन्ही सामन्यात विजयाची गरज असताना आता श्रेयस अय्यरला संधी का दिली जात नाहीये? असा सवाल विचारला जात आहे. सध्या टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्यासाठी जागा नाही, असं म्हणत अजित आगरकर यांनी प्रश्नाला पत्रकार परिषदेमध्ये बगल दिली होती. अशातच आता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवणाऱ्या अय्यरला संधी कधी मिळणार? असा सवाल विचारला जातोय.
शुभमन गिल (ण्), ऋषभ पंत (ेंख्), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (ेंख्), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, यशस्वी जयसवाल, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, अंशुल कंबोज.
