Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. अशातच आता मालिकेत 2-1 ने मागं असलेल्या टीम इंडियाला दोन मोठे धक्के बसले आहेत. अर्शदीप सिंग आणि नितीश कुमार रेड्डी चौथ्या कसोटीसाठी अनुपलब्ध असतील. बीसीसीआयने याची अधिकृत घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी एक गुड न्यूज देखील दिली.

नितीश कुमार रेड्डी मालिकेतून बाहेर

डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी उर्वरित दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे. नितीश मायदेशी परतणार आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. अर्शदीप सिंगला इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीतून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बेकेनहॅम येथे सराव सत्रात नेटमध्ये गोलंदाजी करताना त्याच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.

अंशुल कंबोजची एन्ट्री

टीम इंडियाच्या सिलेक्शन कमिटीने अंशुल कंबोजला संघात समाविष्ट केलं आहे. अंशुल कंबोज मँचेस्टरमध्ये संघात सामील झाला आहे, असंही बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. चौथी कसोटी 23 जुलै 2025 रोजी सुरू होईल. अंशुल कंबोज याला चौथ्या कसोटीत डेब्यू संधी आहे.

चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया –

शुभमन गिल (ण्), ऋषभ पंत (ेंख्), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (ेंख्), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, यशस्वी जयसवाल, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, अंशुल कंबोज.