नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
”राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रमुखांनी छावा संघटनेच्या नेत्यावर हल्ला केला. हे सरकार नाही, गुंडाची टोळी आहे”, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी केली. राज्यातील चर्चेत असलेले हनी ट्रॅप प्रकरण, राज्यातील चार मंत्र्यांचं पद जाण्याची शक्यता यासह महाविकास आघाडीचं सरकार कसं कोसळलं? यावर त्यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
”आधीच सरकार घटनाबाह्य आहे. आता सरकार अनैतिक आहे. एवढा हतबल मुख्यमंत्री पाहिला नाही”, असे म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
हनी ट्रॅपवरून गंभीर आरोप- खासदार राऊत म्हणाले, ”हनी ट्रॅपचे आरोप होताना विरोधी पक्षावर आरोप करणाऱ्या महिल्या नेत्या कुठे गेल्या? राणा भीमादेवी थाटात येत होत्या. मंत्र्यांच्या बारमध्ये महिला सापडल्या आहेत. मी केलेल्या ट्वीटची मुख्यमंत्र्यांनी पडताळणी करून पाहावी. प्रफुल्ल लोढा या नावाच्या व्यक्तीचा फोटो आहे. त्याच्यावर हनी ट्रॅप अंतर्गत गुन्हा दाखला आहे. याची सूत्रे जामनेरमध्ये आहेत. ज्यांनी हनी ट्रॅपममध्ये अडकविले तेदेखील हनी ट्रॅपमध्ये सापडले आहेत. त्याबाबत अधिक माहितीसाठी एकनाथ खडसे यांची मुलाखत घ्यावी”.
हनी ट्रॅप हा भाजपावरच उलटला- हनी ट्रॅपबाबत पुढे राऊत म्हणाले, ”पोलीस हे हनी ट्रॅपमधील व्हिडिओ शोधण्यासाठी जंगजंग पछाडत आहेत. हनी ट्रॅप हा भाजपावरच उलटला आहे. विरोधकांसाठी भाजपानं हनी ट्रॅप लावला. ते स्व: अडकले आहेत. प्रफुल लोढा यांचे मुख्यमंत्र्यांसोबतदेखील फोटो आहेत. 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये सापडले आहेत भाजपाच्या वॉशिंगमशीनमध्ये सर्व काही धुतले जात आहे. पोलीस चार पेनड्राईव्ह आणि 2 सीडी शोधत आहेत. अशा प्रकरणात शक्यतो तक्रारदार नसतो. पण, परिणाम दिसून येतो. आमच्या चार तरुण खासदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकविले. त्यांना भाजपामध्ये शुद्धीकरण करून घेतलं”.
हनी ट्रॅपमधून सरकार पाडलं-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आमचे सरकार हे हनी ट्रॅपमुळे पडल्याचा नुकतेच दावा केला. त्यावर खासदार राऊत म्हणाले, ”आमचे सरकार हे पडले नाही, पाडले होते. आमचे 16 ते 17 आमदार हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. त्यामुळे सरकार पडलं होतं. हनी ट्रॅपमुळे अनेक लोकांना दरदरून घाम फुटला. त्यामुळे ते सुरतला रवाना झाले होते. एकनाश शिंदे आणि भाजपा यांचा हिंदुत्वाशी संबंध नाही. अजित पवार यांचा शाहु, फुले आणि आंबेडकर यांच्याशी संबंध नाही. आमदार आणि खासदार यांनी पळून जाण्याची कारणे वेगळी आहेत. घाशीराम कोतवाल हे जसे पेशवाई चालवायचे तसे हे सरकार चालवित आहेत. प्रताप सरनाईक यांनी हनी ट्रॅपचा अभ्यास करावा. एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट आता भाजपाला ओझे झाला आहे”.
मुख्यमंत्र्यांवर टीका- राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून खासदार राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ते म्हणाले ”केवळ कायद्याची पदवी असणं पुरेसं नाही. नाव फडणवीस असले तर संस्कार नाहीत. कायदा व्यवस्था रसातळाला जात आहे. असे असले तरी फडणवीस केवळ समर्थन करून भाषण करत आहेत. आजएवढा भ्रष्टाचार, व्याभिचार आणि गुंडागर्दी कुणीही पाहिली नाही. रमी खेळणाऱ्या मंत्र्यांचं समर्थन केल जात आहे. दुसरे कुणी असते तर मुख्यमंत्री विधानभवनाच्या पायऱ्यावर ऊर बडवित बसले असते”.
चार मंत्री गमाविणार पद?- महायुती सरकारमधील चार मंत्र्यांचं मंत्रिपद जाणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. त्यामध्ये माणिक कोकाटे, संजय शिरसाट आणि संजय शिरसाठ यांच्यासह आणखी एका मंत्र्यांचा समावेश असल्याचा राऊतांनी दावा केला. पहलगामबाबत विचारणार प्रश्न- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. अधिवेशनाच्या पूर्वी राज्यसभा खासदार राऊत म्हणाले, ”पहलगामध्ये हल्ला केलेले दहशतवादी अजून सापडलेले नाहीत. शस्त्रसंधी कोणत्या दबावातून केली, हा प्रश्न आम्ही संसदेत विचारणार आहोत. देशहितासाठी हा प्रश्न विचारणार आहे. हे अधिवेशन खूप महत्त्वाचं आहे, असे आम्ही मानतो. पण, हे सरकार तसं मानतं आहे का?”
