अनु.जा.12, ओबीसी 16, सर्वसाधारण ३२
कुंभोज, घुणकी, कबनूर, सावर्डे खुले
आळते, रूकडी, पट्टणकडोली, कोरोची ओबीसी
विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा (संतोष पाटील)
या पुर्वी दोन वेळा केलेल्या सरपंच पदाच्या आरक्षणामध्ये त्रुटी आढळल्यामुळे सोमवारी तहसिलदार सुशिलकुमार बेल्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली ६१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे फेर आरक्षण सोडत व्दारे काढण्यात आले. यामध्ये अनु.जातीसाठी 12, ओबीसीसाठी 16 तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३२ ग्रामपंचायतीचं आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. तहसिलदारांच्या दालनात ही सोडत काढण्यात आली.
आज जाहीर झालेल्या आरक्षणमध्ये कही खुशी, कही गम असे चित्र पहायला मिळाले. कुंभोज, घुणकी, कबनूर, सावर्डे खुले तसेच आळते, रूकडी, पट्टणकडोली, कोरोची ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून 13 ठिकाणी आरक्षणात बदल झालेला आहे. पाच वर्षाच्या इहान इरफान मुजावर याच्या हस्ते फेरआरक्षण सोडत काढण्यात आली.
अनु. जाती आरक्षण – एकूण १२ गांवे
बिरदेववाडी , लक्ष्मीवाडी , निलवाडी , जंगमवाडी , संभापूर , माणगांववाडी
महिला आरक्षीत – अंबपवाडी, माणगांव, कापुरवाडी, अतिग्रे, सोनार्ली, कासारवाडी
अनु.जमाती स्त्री – हिंगणगांव
नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – १६ गांवे
8 महिला ८ सर्वसाधारण
ना.मा.प्रवर्ग महिला – कोरोची, जुने पारगांव, तिळवणी, मनपाडळे, साजणी, आळते, इंगळी, मुडशिंगी
सर्वसाधारण – पट्टणकोडोली, रूकडी, किणी, तळदंगे, पाडळी, रांगोळी, नवे पारगांव, शिरोली
सर्वसाधारण एकूण – ३२ गावे
सर्वसाधारण महिला – खोतवाडी, टोप, नेज, रुई, तळसंदे, लाटवडे, रेंदाळ, रूई, हेरले, चोकाक, खोची, चावरे, सावर्डे, यळगुड, माले, तासगांव, वाठार तर्फ वडगांव
सर्वसाधारण – हालोंडी, नागांव, भेंडवडे, तारदाळ, चंदूर, घुणकी, दुर्वर्गेडी, कबनूर, वाठार तर्फ उदगांव, कुंभोज, मजले, भादोले, नरंदे, मौजे वडगांव, मिणचे, अंबप
