Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

क्रिकेटर हार्दीक पांड्याचा वर्षभरापूर्वी डिवोर्स झाला. नताशा स्टॅनकोविकला डिवोर्स दिल्यानंतर हार्दिक पंड्याचं नाव जास्मिन वालियाशी जोडले गेलं होतं. चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान जास्मिन वालिया स्टेडियममध्ये सामना पाहताना दिसली होती.  त्यानंतर मॉडेलचे नाव सतत भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्याशी जोडले जात होते. जस्मिन अनेकदा हार्दिकच्या टीम मॅचेसमध्ये दिसली होती. त्याचबरोबर ती मुंबई इंडियन्स टीम बसमध्येही दिसली होती. या जोडप्याला अनेक महिने डेट केल्याची चर्चा होती.

दरम्यान जास्मिन आणि हार्दीक पांड्याचा ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली आहे.  सोशल मीडियावर दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याचं समोर आलं आहे.  एका चाहत्याने रेडिटवर कमेंट केली आणि दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे.  रेडिट युझरने लिहिलंय, ‘हार्दिक पंड्या आणि जास्मिन वालियाने एकमेकांना अनफॉलो केले?’ मी अलिकडेच पाहिले की त्यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. काय चाललंय?’.

हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालिया यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं असलं तरी दोघांनीही त्यांच्या डेटिंगच्या बातम्यांवर कोणतीही टिप्पणी केली नाही. तसंच ब्रेकअपच्या चर्चांवरही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

जास्मिन वालिया कोण आहे?

जास्मिन वालिया ही एक ब्रिटिश गायिका आणि मॉडेल आहे. तिचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. तिचे पालक भारतीय वंशाचे आहेत.  तिने द ओन्ली वे इज एसेक्स या ब्रिटिश रिॲलिटी टीव्ही मालिकेत काम केलं होतं.  या शोमध्ये भाग घेतल्यानंतर जास्मिनला लोकप्रियता मिळाली. तिने 2010 मध्ये शोमध्ये अतिरिक्त म्हणून सुरुवात केली होती परंतु लवकरच तिचा ठसा उमटवला आणि 2012 पर्यंत ती शोचा पूर्ण भाग बनली. या लोकप्रिय रिॲलिटी शोमध्ये तिच्या उपस्थितीमुळे तिला मनोरंजन उद्योगात तिची ओळख निर्माण करण्यास मदत झाली आणि संगीतातील इतर सर्जनशील मार्गांचा शोध घेण्यास मदत झाली.