मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
”कटेंगे तो बटेंगे” या फॉर्म्युल्यावरच ठाकरे बंधू चालतायत, असा जबरदस्त घणाघात थेट मंत्री नितेश राणेंकडून करण्यात आलाय. राजकारणाच्या रणांगणात ठाकरे बंधूंचा एकमेकांवरचा विश्वासच राहिलेला नाही, अशी खरमरीत टीका करत राणेंनी ‘घरातलंच घरभेदी’ चित्र समोर ठेवलंय.
पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न करून दाखवावा, मी त्यांना सांगतो की, तुम्ही पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, राज्यातील दुकानंच नाही तर शाळाही बंद करू, असं आव्हान राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलं. यावर शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा. तिथे मराठी शिकवली जात नाही, तिथे अभ्यास शिकवला जात नाही, असं भाजपचे नेते व मंत्री नितेश राणेंनी आज माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आलीच पाहिजे, असं मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मीरारोडच्या सभेत ठणकावून सांगितलं होतं. महाराष्ट्रात राहताय शांतपणे रहा, मराठी शिका, आमचं काही तुमच्याशी भांडण नाहीय. पण मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
