६,७३,२०० किमतीचे मेफेड्रॉन (एम डी) ड्रग्ज जप्त
पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांचे प्रयत्न
विठ्ठल बिरंजे /महान कार्य वृत्तसेवा
कोरोची तालुका हातकणंगले येथे ड्रग्ज ची मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 6 लाख 73 हजार 200 रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे.
शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री कारवाई केली. आतापर्यंत जिल्ह्यात ड्रगची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते.
याबाबत अधिक माहिती अशी, पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांना खबऱ्यांमार्फत कोरोची मध्ये विक्रीसाठी ड्रग्स आणले जाणार असल्याची माहिती मिळाली. यावेळी त्यांनी सापळा रचुन रात्री 11 वाजताचे सुमारास कोरोची गावचे हद्दीत साईनाथ वजन काट्याजवळ पंचगंगा साखर कारखाना ते कोरोची जाणारे रोडवर ही कारवाई केली. ऋषभ राजू खरात वय ३० वर्षे रा. लोकमान्य नगर, कोरोची ता. हातकणंगले याला मुद्देमालासह पकडले असून या कारवाईत ६,७०,२०० रुपये किमतीचे मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थ एकूण वजन १३४.०४ ग्रॅम, २५००/- रुपये रोख रक्कम, ५०० रुपये किंमतीचे इतर साहित्य असे ६,७३,२०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव,
उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवे, याचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे, श्रीकृष्ण दरेकर, पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे, प्रमोद भांगरे, महेश कोरे, अर्जुन फातले, रोहित डावाळे, सतिश कुंभार, आयुब गडकरी, शशिकांत ढोणे, होमगार्ड महेश शेळके, इम्रान मुल्ला यांनी ही कारवाई केली.
सतीश कुंभार यांचे अभिनंदन
पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डीबी पथकात सेवेत असताना यापूर्वी अनेक मोठ्या कारवाई केल्या आहेत. आतापर्यंत केलेले कारवाईत त्यांची ही सर्वात मोठी कारवाई आहे त्यामुळे पोलीस वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
