Spread the love

संकेश्वर / महान कार्य वृत्तसेवा

रांगोळी (ता.हातकणंगले) येथील ग्रा.पं.सदस्य लखन बेनाडे याचा संकेश्वर (ता.निपाणी) पोलीस ठाण्याच्या हद्दीजवळ खून झाल्याची माहिती सुत्रांकडून समजते. अनैतिक संबंधातून त्यांचा घातपात झाल्याची शंका व्यक्त होत आहे. ही घटना सर्वसाधारणपणे पाच ते सहा दिवसापुर्वी घडल्याची शक्यता आहे. याचे वृत्त दुपारी 12.20 नंतर रांगोळीत धडकताच एकच खळबळ उडाली. दरम्यान, लखन बेनाडे हा बेपत्ता असल्याची फिर्याद इचलकरंजी गावभाग पोलीसात लखन यांची बहिण निता तडाखे यांनी फिर्याद दिली असून 10 जुलै पासून तो बेपत्ता असल्याचे म्हटले आहे.

याबाबत संकेश्वर पोलीस व रांगोळी गावातून कळालेली अधिक माहिती अशी, लखन बेनाडे याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. परंतू काही महिन्यांपासून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. याचे व्हिडीओ यावर सोशल मिडीयावरून व्हायरल झालेले आहेत. यावरून या प्रकरणात संबंधीत महिलेचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेनाडे याचा मृतदेहाचे दोन तुकडे करून पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्न केल्याचे समजते. दरम्यान, एका संशयीत आरोपीस संकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.