Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल-ठोकूर, मुंबई सेंट्रल-सावंतवाडी रोड, वांद्रे टर्मिनस-रत्नागिरी, वडोदरा-रत्नागिरी आणि विश्वामित्री-रत्नागिरी स्थानकांदरम्यान विशेष गाड्या चालवणार आहे.

09011 मुंबई सेंट्रल – ठोकूर स्पेशल मंगळवारी मुंबई सेंट्रलहून सकाळी 11:30 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8:50 वाजता ठोकूरला पोहोचेल. ही ट्रेन 26 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर रोजी धावेल.

त्याचप्रमाणे 09012 ठोकूर – मुंबई सेंट्रल ही विशेष गाडी बुधवारी ठोकूर येथून सकाळी 11 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7:15 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन दि. 27 ऑगस्ट आणि 3 सप्टेंबर रोजी धावेल.

ट्रेन क्रमांक 09019 मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड विशेष आठवड्यातून रविवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी धावेल. ही ट्रेन मुंबई सेंट्रलहून सकाळी 11:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2:30 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. ही ट्रेन 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. 09020 सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल विशेष गाडी आठवड्यातून 4 दिवस म्हणजे रविवार, सोमवार, गुरुवार आणि शनिवार धावेल. ही ट्रेन सावंतवाडीहून पहाटे 4:50 वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री 8 :10 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर पर्यंत धावेल.

ट्रेन क्रमांक 09015 वांद्रे टर्मिनस – रत्नागिरी स्पेशल ही गाडी गुरुवारी दुपारी 2:20 वाजता वांद्रे टर्मिनस येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 12 :30 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ही ट्रेन 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. 09016 रत्नागिरी – वांद्रे टर्मिनस स्पेशल शुक्रवारी रत्नागिरीहून रात्री 1:30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 12 :30 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन 22 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत धावेल.

ट्रेन क्रमांक 09114 वडोदरा – रत्नागिरी स्पेशल मंगळवारी वडोदरा येथून सकाळी 11:15 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 12 :30 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ही ट्रेन 26 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर रोजी धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. 09113 रत्नागिरी-वडोदरा स्पेशल बुधवारी रत्नागिरीहून पहाटे 1:30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 5 :30 वाजता वडोदरा येथे पोहोचेल. ही ट्रेन 27 ऑगस्ट आणि 3 सप्टेंबर रोजी धावेल.

ट्रेन क्रमांक 09110 विश्वामित्री – रत्नागिरी स्पेशल ही बुधवार आणि शनिवारी सकाळी 10:00 वाजता विश्वामित्रीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रात्री 12 :30 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ही ट्रेन 23 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. 09109 रत्नागिरी – विश्वामित्री स्पेशल ही गाडी रविवार आणि गुरुवारी रत्नागिरीहून पहाटे 1:30 वाजता निघेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 5: 30 वा. विश्वामित्रीला पोहोचेल. ही ट्रेन 24 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर पर्यंत धावेल. 09011, 09019, 09015, 09114 आणि 09110 या ट्रेन क्रमांकांसाठी बुकिंग दि. 23 जुलैपासून सर्व पीआरएस काउंटर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल.