नाशिक / महान कार्य वृत्तसेवा
जिल्ह्यातील दिंडोरी- कळवण रस्त्यावर कार आणि दुचाकीच्या अपघातात सात जणांचा मृत्यू झालाय. अपघातात कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात पलटल्यानं कारमधील प्रवाशांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि एका बालकांचा समावेश आहे.
कार अनब दुचाकीमध्ये भीषण अपघात : मिळालेल्या माहितीनुसार, 16 तारखेला मध्यरात्री दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत दिंडोरी-कळवण रस्त्यावर दिंडोरी येथील कुटुंब नातेवाईकाच्या मुलाचा वाढदिवस साजरा करून घरी परतत असताना त्यांच्या कार अनब दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. अपघातानंतर कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात जाऊन पलटी झाली. दरम्यान, कारचा दरवाजा लॉक झाल्यानंतर नाल्यातील पाणी कारमधील प्रवाशांच्या नाका-तोंडात गेल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या अपघातातील मृतांमध्ये तीन पुरुष, तीन महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. सर्व मृत व्यक्ती हे नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील : मिळालेल्या माहितीनुसार, देविदास पंडित गांगुर्डे, उत्तम एकनाथ जाधव, अल्का उत्तम जाधव, दत्तात्रेय नामदेव वाघमारे, अनुसया दत्तात्रय वाघमारे, भावेश देविदास गांगुर्डे यांचा अपघातात मृत्यू झालाय. अपघातातील सर्व मृत व्यक्ती हे नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील रहिवासी होते. तसेच मोटारसायकलवरील मंगेश यशवंत कुरघडे, अजय जगन्नाथ गोंद हे दोघेसुद्धा जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि इतर यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरू केले.
