मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारच्या काळात मोठा भष्टाचार होत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ” सर्व ठिकाणी भष्टाचार केला जात आहे. जिथे भष्टाचार आहे, तिथे स्थगिती दिली जाते. फक्त शिंदे गटाच्या 5 मंर्त्यांची चौकशी केली पाहिजे, म्हणजे सर्व घोटाळा समोर येईल. त्यामध्ये उदय सामंतांचीदेखील चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली.
सत्ताधाऱ्यांचे डोकं ठिकाणावर नाही- राज्यात पुरंदर आणि नवीन मुंबईत नवीन विमानतळ सुरू करण्यात येणार आहे. तसेच धारावी येथे अदानी उद्योगाकडून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प करण्यात येत आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, ”दिल्ली नेत्यांकडून मुंबईला लुटण्याचं काम सुरू आहे. त्याचं उदाहरण म्हणजे धारावी प्रकल्प आहे. महाराष्ट्राला आणि मुंबईला दिल्लीच्या नेत्यांकडून लुटण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं मुंबई लुटणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये. आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानीसाठी तयार केले जात आहे. प्रत्येक प्रकल्प अदानीसाठी बनवला जात आहे. सत्ताधाऱ्यांचे डोके ठिकाणावर नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे धनदांडग्यासाठी आहे. अदानींसाठी सर्व काही करत आहे,” असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.
किल्ले तुम्ही बांधले काय?- ”छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. याबाबत राज्य सरकार आणि भाजपाकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, किल्ले काय तुम्ही बांधले काय?”असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित करत उगाच याचे राजकारण करू नका, असा टोला महायुती सरकारला लगावला.
मंत्री आणि सत्ताधारी यांच्या घरात किती मद्यपानाचे परवाने? शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरून शिरसाट यांनी खासदार राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचं वक्तव्य केलं. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, ”व्हीडिओ मॉर्फ केला नाही. तो ओरिनल व्हीडिओ आहे. व्हीडिओची सत्यता फॉरेन्सिक लॅब ठरवेल. दुसरीकडे मद्य विक्रीच्या परवान्याला मान्यता देण्यास आली आहे. त्यातील मंत्री आणि सत्ताधारी यांच्या घरात किती मद्यपानाचे परवाने किती गेले? हे तपासा म्हणजे समजेल,” अशी टीका खासदार राऊतांनी केली.
राज-उद्धव एकत्र येण्यावर सकारात्मक संकेत- ”दोन ठाकरे बंधू उद्धव-राज एकत्र येण्यावरुन आता बरीच चर्चा झाली आहे. लोकांची भावना आहे की, हे दोन भाऊ एकत्र यावेत. उद्धव ठाकरे म्हणालेत की, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील होईल. तुमच्या मनात आहे, ते होईल. फार चर्चा नको. फार चर्चा न करता निर्णय झाले पाहिजेत. मुंबई महानगरपालिका निवडणुका एकदा जाहीर होऊ दे, मग बघू. पण तुमच्या मनातील होईल,” असं शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत म्हणाले.
