मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांची अमेरिकन कंपनी ‘टेस्ला’चा आता भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेची बदललेले व्यापर धोरण, समीकरण आणि आयात शुल्काचा फटका भारतासह जगातील सर्वच देशांना बसलाय. त्यात भारतात टेस्लाचा होत असलेला प्रवेश ही फार मोठी सकारात्मक घडामोड मानली जात आहे.
मुंबईत मंगळवारी कंपनीच्या पहिल्या शोरूमच अनावरण : येत्या मंगळवारी (15 जुलै) रोजी मुंबईत टेस्लाच भारतातील पहिल शोरुम सुरू होत आहे. या शोरुममध्ये ग्राहकांना टेस्लाच्या दमदार इलेक्ट्रिक कार जवळून पाहता येतील. तसेच या आलिशान कारची टेस्ट ड्राईव्हही याच आठवड्यापासून ग्राहकांकरता उपलब्ध होईल. या शोरूममध्ये ग्राहकांचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी अनेक एआय फीचर्ससुद्धा उपलब्ध करण्यात आलेत आहेत. इंटरॲक्टिव्ह स्क्रीन आणि डिस्प्लेच्या माध्यमातून ग्राहकांना कारची माहिती मिळेल. हे सेंटर केवळ ईव्ही कारच शोरूम नाही तर इथ ग्राहकांना टेस्लाची मॉडेल 3, मॉडेल भ्, मॉडेल ए, मॉडेल र्ें आणि सायबरट्रकचीही माहिती मिळेल. याशिवाय ग्राहकांना टेस्लाची सौरऊर्जा उत्पादनही दिसतील. सोलर पॅनल, पावरवॉल, सोलर रुफ हेदेखील इथं येणाऱ्यांना पाहायला मिळतील.
सोमवारी परिवहन मंर्त्यांच्याहस्ते टेस्लाला मिळणार परवाना : याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याहस्ते टेस्लाला ई-वाहन विक्री परवाना पत्र देण्यात येईल. मंत्रालयातील प्रताप सरनाईकांच्या दालनात हा सोहळा पार पडेल. 15 जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड ड्राईव्हमध्ये या शोरूमच उद्धघाटन होईल. बीकेसी हे मुंबईच्या मध्यवर्ती भागातील एक प्राईम लोकेशन आहे. ॲप्पलचे भारताचील फ्लॅगशिप स्टोअरही याच परिसरात आहे. मार्च महिन्यात टेस्लानं इथ जवळपास 4000 चौरस फूटाची जागा भाड्यावर घेतली आहे. इतर भारतीय कंपन्यांना टेस्ला देणार आव्हान : भारतात केवळ शोरुम उघडण्यापर्यंत टेस्लाची दौड मर्यादित राहिलेली नाही . भारतीय बाजारपेठेत टेस्लाच्या येण्यानं वाहन उद्योगात मोठी बदल होण्याची शक्यता आहे. भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहननिर्मिती आणि विक्री नुकतीच सुरू झालीय. टेस्ला हा आंतराष्ट्रीय बाजारपेठेत ईव्ही तयार करणारा एक मोठा बँड आहे. टेस्लानं जर भारतीय बाजारपेठेत परवडणाऱ्या दरात वाहनविक्री केली तर तर इतर भारतीय कंपन्यांसाठी ते एक मोठे आव्हान ठरण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
