रायगड / महान कार्य वृत्तसेवा
राज्य परिवहन महामंडळाच्या निष्काळजी आणि अमानवी वागणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये शिवशाही अण् बसमधून (एप्ग्न्ेप्रप्ग् अण् ँल्े) प्रवास करत असलेल्या दिव्यांग जोडप्याला अर्ध्या प्रवासात जबरदस्तीनं खाली उतरवण्यात आल्याचा आरोप एऊ बस चालकावर करण्यात आला आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, याप्रकरणी प्रहार दिव्यांग संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
काय आहे घटना? : दिव्यांग जोडपे नसीर निगुडकर आणि नसिमा निगुडकर हे माणगावहून पोलादपूरकडे जात होते. नसीर यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही आणि त्यांच्या पत्नी नसिमा या ठेंगण्या असल्यामुळे दोघेही दिव्यांग प्रमाणपत्रधारक आहेत. मात्र, तरीदेखील या जोडप्याला बसमधून अपमानास्पद वागणूक देत, महाडपासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर अर्धवट प्रवासात खाली उतरवण्यात आले. ही संपूर्ण घटना एसी बंद केल्याच्या वादातून उफाळून आली. प्रवासादरम्यान एसी बंद केल्यामुळे या जोडप्याने आक्षेप घेतला. त्यावरुन चालकाचा पारा चढला आणि त्याने दोघांनाही रस्त्यावर उतरवले. या गोंधळात नसिमा निगुडकर यांना दुखापत झाली असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
संबंधित चालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात मागणी : या घटनेनंतर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते महाड एसटी आगारात धडकले आणि संबंधित चालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. संघटनेकडून आरोपी चालकावर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. या घटनेमुळे एऊ महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संवेदनशीलतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. दिव्यांग प्रवाशांशी अशी वागणूक दिली जात असल्यास, सामान्य प्रवाशांचे काय? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन संबंधित दोषींवर तत्काळ कारवाई होण्याची मागणी सध्या जोर धरत आहे.
