Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

भारताच्या विदेशी साठ्यात प्रचंड घसरण झाली आहे. सोन्याच्या साठ्यात वाढ झाली असली तरी परकीय चलनसाठा घसरला आहे. सततच्या डॉलर रूपया व इतर चलनात होत असलेल्या चढ उताराने बाजारातील अस्थिरता वाढली. परिणामी भारताच्या विदेशी साठ्यात घट झाली.आरबीआयच्या सरकारी आकडेवारीनुसार, परकीय चलनसाठ्यात चार जुलैपर्यंत 699.736 अब्ज डॉलर्सवरून घसरत आकडेवारी 3.049 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. चलनसाठ्यातील परदेशी चलनात 4 जुलै 2025 पर्यंत 591.287 अब्ज डॉलरवरून घसरत 3.537 अब्ज डॉलर्सवर चलनसाठा राहिला आहे.विशेष रेखांकन अधिकार यामध्ये चलनसाठ्यातील प्रमाण घसरत 39 दशलक्ष डॉलर्सवर पोहोचले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटना मधील आकडेवारीनुसार, संरक्षित चलनसाठा मात्र 107 दशलक्ष डॉलर्सवरून वाढत 4.735 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. यापूर्वीच रिझर्व्‌‍ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ‘भारताला सहज 11 महिने पुरेल इतका परकीय चलनसाठा आपल्याकडे उपलब्ध आहे ‘ असे विधान वित्तीय पतधोरण समितीचा निकाल जाहीर करताना केले होते. दुसरीकडे,आरबीआयच्या आकडेवारीनुसार, मागील आठवड्यात सोन्याचा साठा 342 दशलक्ष डॉलर्स वाढून 84.846 अब्ज डॉलर्स झाला आहे. जागतिक बँकेकडे असलेले विशेष रेखांकन हक्क देखी ल 39 दशलक्ष डॉलर्सवरून वाढत 18.868 अब्ज डॉलर्स झाले आहेत तर आयएमएफकडे देशाची राखीव आर्थिक परिस्थिती देखील 107 दशलक्ष डॉलर्सवाढून 4.735 अब्ज डॉलर्स झाली आहे.

यापूर्वी आर्थिक वर्ष 2023 मध्ये चलनसाठा, आर्थिक वर्ष 2002 मधील 71 अब्ज डॉलर्समध्ये 58 अब्ज आणखी वाढला होता.आर्थिक वर्ष 2024 मध्ये हा चलनसाठा 20 अब्ज डॉलर्सने वाढल्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये परकीय चलनसाठा 70 4.885 अब्ज डॉलर्स या नव्या उच्चांकावर पोहोचला.आरबीआय जगभरातील अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी भारत आपल्या खजिन्यात जास्तीत जास्त चलन व सोनेसाठा वाढवत असते. जितके चलनसाठा अधिक तितकी देशाची आर्थिक स्थि ती मजबूत समजली जाते. भारताच्या अर्थकारणातील परिस्थितीही मजबूत असल्याने याचा आणखी फायदा चलनसाठ्यात होत आहे. मात्र यंदा 4 जुलैपर्यंत रूपयांच्या घसरणीशिवाय, कमोडिटी, व बाजारातील चढउताराचा काही प्रमाणात फटका धातू व चलनाला बसला आहे. रूपयांची घसरण होत असताना किंवा अर्थव्यवस्थेत चलनाची तुट असताना डॉलर विकून आरबीआय बाजारातील तरलता टिकवण्यासाठी प्रयत्न करते.