नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
अहमदाबाद विमान अपघातात तब्बल 260 नागरिकांचा बळी गेला आहे. आता एएआयबीनं अहमदाबाद विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल सादर केला. या अहवालात एएआयबीनं विमान अपघाताचा घटनाक्रमच सादर केला आहे. एअर इंडिया अख171 विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं (अअखइ) जाहीर केल्यानंतर एअर इंडियानं 15 पानांचा प्राथमिक अहवाल मिळाल्याची कबुली दिली. एएआयबी अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र एअर इंडियानं या अहवालावर भाष्य केलं आहे. ”झालेल्या नुकसानीबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो, एएआयबी अधिकाऱ्यांना चौकशीत पूर्ण सहकार्य करत आहोत,” असं एअर इंडियानं सोशल माध्यमांवर स्पष्ट केलं आहे.
चौकशीत पूर्ण सहकार्य, एअर इंडियानं स्पष्ट केली भूमिका : एएआयबीनं अहमदाबाद विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल सादर केला. या अहवालावर एअर इंडियानं सोशल माध्यमांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ”झालेल्या नुकसानाबद्दल आम्ही शोक व्यक्त करत आहोत. या कठीण काळात मदत करण्यास आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. एअर इंडिया नियमांसह भागधारकांसोबत जवळून काम करत आहे. आम्ही एएआयबी अअखइ आणि इतर अधिकाऱ्यांना त्यांच्या चौकशीत पूर्ण सहकार्य करत आहोत,” असं एअर इंडियानं सोशल माध्यमांवरील पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
एएआयबीच्या अहवालात काय दिलं कारण : एएआयबीनं अहमदाबाद विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. या अहवालात एएआयबीनं अहमदाबाद विमान अपघाताचा भयंकर घटनाक्रम सादर केला आहे. त्यानुसार अहमदाबाद गॅटविक विमान उड्डाणानंतर लगेच कोसळलं. या दरम्यान, ”विमानाचे दोन्ही इंजिन सुरुवातीच्या चढाई दरम्यान अनपेक्षितपणे बंद पडले. विमानाच्या एन्हांस्ड एअरबोर्न फ्लाइट रेकॉर्डर (एअऋठ) कडून मिळालेल्या फ्लाइट डेटावरून असं दिसून आलं आहे की, लिफ्टऑफनंतर काही क्षणातच दोन्ही इंजिनला इंधन कटऑफ स्विच ठणछ वरून उणढजऋऋ वर हलवलं गेलं. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये एक वैमानिक दुसऱ्याला कटऑफ का केलं असं विचारत आहे. दुसऱ्या वैमानिकानं त्यानं असं केलं नसल्याचं सांगितलं. दोन्ही इंजिनला इंधन न मिळाल्याने राम एअर टर्बाइन (ठअढ) तैनात करण्यात आली. विमान लगेचच उंची गमावू लागले. पॉवर फ्लाइट टिकवून ठेवण्यात अपयश आलं.” एएआयबीच्या एएआयबी अहवालानुसार, ”दोन्ही इंजिन रिलीट करण्याच्या प्रयत्नात वैमानिकांनी इंधन स्विच पुन्हा सुरू केलं. इंजिन 1 मध्ये थस्ट रिकव्हर होण्याची चिन्हं दिसली. मात्र इंजिन 2 स्थिर होऊ शकलं नाही. त्यामुळे विमान निवासी इमारतींवर कोसळण्याच्या काही सेकंद आधी अंतिम संकटाचा ‘मेडे’ कॉल देण्यात आला.”
