Spread the love

पुलाची शिरोली / महान कार्य वृत्तसेवा (विद्याधर कांबळे)

हातकणंगले तालुक्यातील टोप व करवीर तालुक्यातील शिये या ठिकाणी दगड खाणी उत्खनन व क्रशर उद्योगावर गुरुवारी मोठी कारवाई करण्यात आली असून, 37 क्रशर उद्योगाला सील ठोकण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात इतके मोठ्या प्रमाणात ही पहिलीच कारवाई मानली जाते. विधान परिषदेचे काँग्रेस गट नेते सतेज पाटील यांनी बुधवारी या संदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता.

दगड खाणीत उत्खनन करणारा हेलिकॉप्टर घेत असेल तर शासनाला किती पैसे मिळाले पाहिजेत, अशी विचारणा आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

कोल्हापूर जिल्ह्यामधील हातकणंगले तालुक्यातील टोप आणि कासारवाडीच्या हद्दीत  डोंगररांगात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत उत्खनन केले जात आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हे उत्खनन नजरेस पडत नाही. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळ्वर पट्टी बांधली आहे. असा संताप व्यक्त करीत सतेज पाटलांनी सभागृहाची लक्ष घेतली होती यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते. यानंतर महसूल प्रशासनाने तातडीने कारवाई मुळे परिसरातील रहिवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.

प्रांत अधिकारी दीपक शिंदे यांच्या आदेशानंतर करवीर, हातकणंगले येथील महसूल अधिकारी सकाळी टॉप व शिये येथे दाखल झाले ४६ क्रशर उद्योगांची तपासणी केली. यामध्ये ९ क्रशर  उद्योजकांकडे रितसर परवाने मिळून आले. उर्वरित ३७ क्रशर उद्योग ट्रेडिंग परवाना नसणे, रॉयल्टी न भरणे,  प्रदूषण महामंडळाचे प्रमाणपत्र नसणे, बिगर शेती परवाना नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर कारवाई करण्यात आली.

या कारवाईत पुलाची शिरोली मंडल अधिकारी सीमा मोरये, वडगाव मंडल अधिकारी पांडुरंग धुमाळ, वाठार मंडल अधिकारी अमित लाड यांच्यासह पुलाची शिरोली,  वडगाव, वाठार मंडल क्षेत्रातील तलाठी, कोतवाल यांचा समावेश होता.