Spread the love

शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावरून विरोधकांची टीका

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेत. काल बुधवारपासून एकनाथ शिंदे हे दिल्लीत आहेत. दिल्लीत त्यांनी एका बड्या नेत्याची भेट घेतल्याची राजकीय वतुर्ळात चर्चा आहे. तर आजसुद्धा एकनाथ शिंदे दिल्लीत असल्याची माहिती समोर येत आहे. पण पावसाळी अधिवेशन सुरू असताना अचानक एकनाथ शिंदे दिल्लीला कसे काय गेले, यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जाताहेत.

दिल्ली दौऱ्यावरून लढवले जाताहेत तर्कवितर्क…: एकनाथ शिंदेंनी आपले अनेक नियोजित कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. तसेच दिल्लीत अनेक नेत्यांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्याचे बोलले जात आहे. शिंदे ह मुंबईतील सिंदूर पुलाच्या उद्धाटनालाही अनुपस्थित राहिले. दरम्यान, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. परंतु पावसाळी अधिवेशन सुरू असताना अचानक एकनाथ शिंदे यांनी दिल्लीवारी केल्यामुळं त्यांच्या दौऱ्यावर विरोधकांनी मात्र टीकास्त्र डागले आहे.

विकासकामांसाठी गेले असतील…: दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना काल मी दिवसभर सभागृहात होतो. काल त्यांनी दिल्लीत कोणाच्या गाठीभेटी घेतल्या, याबद्दल मला माहीत नाही. मात्र शेवटी दिल्लीत नेत्यांच्या गाठीभेटी घेणं आणि मुंबईच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, दिल्लीतून महाराष्ट्रात निधी आणणे ही आमची जबाबदारी आहे आणि त्याच भावनेने एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले असतील, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिलीय.

गँगवॉरची कहाणी सांगायला गेले असतील…: सध्या महाराष्ट्रात चाललंय तरी काय? आणि कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? अशी परिस्थिती आणि असे प्रश्न महाराष्ट्रात असताना या सरकारमध्ये आपापसातच वाद आहेत. भांडणं आहेत. गँगवॉर सुरू आहे. मात्र एकनाथ शिंदे नक्की दिल्लीला कशासाठी गेलेत हे माहीत नाही. मात्र सरकारमधील जे गँगवॉर सुरू आहे, ते दिल्लीतील नेत्यांना सांगायला गेले असतील, सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे, त्याची कहाणी सांगायला ते दिल्लीला गेले असतील, असा टोला काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर लगावलाय.