आयुक्त, प्रांताधिकार्यांकडे मागितला न्याय
इचलकरंजी विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा (संतोष पाटील)
पैशाच्या जोरावर भूमिपुत्रांच्या मालमत्ता घशात घालण्याचा प्रकार इचलकरंजीत नवीन नाही. एकदा मालमत्ता ताब्यात आली की आसपासच्या भूमिपुत्रांना त्रास देण्याचे प्रकार घडत आहेत. असाच अनुभव गोंधळी गल्लीत मूळ भूमिपुत्र असलेल्या धुमाळ कुटुंबियांना येत आहे. विनंती करूनही त्रास न थांबल्यामुळे अखेर धुमाळ यांनी आयुक्त पल्लवी पाटील आणि प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्याकडे तक्रार वजा विनंती अर्ज करून न्यायाची अपेक्षा केली आहे.
गोंधळी गल्ली येतील सिटी सर्वे नंबर 109/अ ही मिळकत गुलाबदेवी जैन धर्मेंद्र लुक्कड धापुदेवी बाफना ममतादेवी जैन सुजाता देवी भन्साली यांनी खरेदी घेतली आहे. या मिळकती लगत धनाजी व बाळकृष्ण धुमाळ यांचं साधं घर आहे. या ठिकाणी ते कायम पणे वास्तव्यास आहेत. सध्या सिटीसर्वे नंबर 109/अ या मिळकतीत बांधकाम सुरू केले आहे. यासाठी महापालिकेने दिलेल्या बांधकाम परवान्याचे नियम धाब्यावर बसवत बेकायदेशीर खोदकाम केले आहे. या खोदकामामुळे शेजारील घरांच्या भिंतींना धोका निर्माण झालेला आहे. अशी तक्रार धुमाळ यांची आहे. या संदर्भात बांधकाम करणाऱ्यांना वारंवार विनंती करणे त्यांनी खोदकाम सुरू केले. त्यामुळे न्याय मिळावा, यासाठी आयुक्त आणि प्रांताधिकारी यांना निवेदन दिल्याचे धुमाळ यांनी सांगितले. तर खोदकामासाठी कोणताही परवाना घेतला नाही. शासनाची रॉयल्टी बुडवल्याची ही तक्रार प्रांताधिकरण दिलेल्या निवेदनात धुमाळ यांनी म्हटले आहे.
आता पहावे लागेल आयुक्त आणि प्रांताधिकारी काय ॲक्शन घेतात आणि भूमिपुत्रांना न्याय मिळतो का?
