Spread the love

नंतर पाकिस्तानच्या मंत्र्यांनाही झालेला पश्चाताप, चूक मान्य करत म्हणालेले…

कराची / महान कार्य वृत्तसेवा

असा एक बॉलिवूड सिनेमा जो पाकिस्तानमध्ये बॅन करण्यात आलेला. त्यासाठी कारण होतं, त्यामध्ये दाखवण्यात आलेला तिरंगा आणि राष्ट्रगीत. पण, नंतर मात्र पाकिस्तानच्या मंत्र्यांना त्यांनी या सिनेमावर घातलेल्या बंदीचा पश्च्‌‍याताप झाला आणि याबाबत त्यांनी जाहीरपणे दु:खही व्यक्त केलेलं.

2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाला केवळ भारतातच नाही तर चीनमध्येही प्रचंड लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट महिला सक्षमीकरणाचा आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्याचा संदेश देणाऱ्या स्पोर्ट्स ड्रामावर आधारित आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? 2016-17 च्या सुमारास भारतीय चित्रपटांवरील बंदी उठवल्यानंतर तो पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार होता. पाकिस्तानच्या सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सॉरनं चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला. चित्रपटाच्या शेवटी भारतीय राष्ट्रध्वजासह म्हणजेच, तिरंगा आणि राष्ट्रगीत असलेला एक महत्त्वाचा सीन दाखवण्यास आक्षेप घेण्यात आला. यामुळे, हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झाला नाही. पाकिस्तानच्या माजी केंद्रीय माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनीही याबद्दल खेद व्यक्त केला.

एका पॉडकास्टमध्ये, पाकिस्तानच्या माजी केंद्रीय माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी खुलासा केला की, ‘दंगल’ सिनेमाबाबत त्यांनी घेतलेल्या त्यांच्या निर्णयाबाबत त्यांना खूप पश्चात्ताप आहे. त्या म्हणालेल्या की, मी चित्रपट न पाहताही प्रदर्शित करण्यास नकार दिला होता आणि हा निर्णय मी आता मागे घेऊ इच्छिते. ती पुढे म्हणाली की, संघीय माहिती मंत्री असताना जर मला एका गोष्टीचा पश्चाताप होत असेल तर ती गोष्ट म्हणजे, पाकिस्तानमध्ये दंगलच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आलीय… दीड वर्षांनी जेव्हा मी हा चित्रपट पाहिला तेव्हा मला जाणवलं की, ‘दंगल’ सिनेमावर बंदी घालण्याचा माझा निर्णय चुकीचा होता. हा एक असा चित्रपट होता, जो आपल्या मुलींसाठी प्रेरणादायी होता.

यापूर्वी एका शोमध्ये बोलताना आमिर खाननं खुलासा केलेला की, पाकिस्तानी सेंसर बोर्टानं ‘दंगल’ फिल्ममधून राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्रगीत हटवण्याची अट ठेवली होती. पण, त्यांनी हे सांगून बंदी घातली की, जर कुणीही आम्हाला आमचा राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत हटवण्यासाठी सांगत असेल, तर त्यांच्यात आम्हाला अजिबात रस नाही… आम्हाला हा बिझनेसच नकोय…

दरम्यान, ‘दंगल’ सिनेमानं फक्त देशातच नाहीतर वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवरही धुवांधार कमाई केलेली. जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय फिल्म्सपैकी ‘दंगल’ सिनेमा एक आहे. हा सिनेमा फक्त 70 कोटींमध्ये तयार करण्यात आला होता. पण, या सिनेमानं 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. आता पाकिस्तानमध्ये फिल्म रिलीज न होऊनही या सिनेमाच्या कमाईवर कोणताही परिणाम झाला नव्हता.