Spread the love

राजकीय पक्ष, साहित्यिक, विविध सामाजिक संघटनाही एकवटणार

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मराठी भाषिक राज्य असतानाही शालेय शिक्षणात हिंदी सक्तीचा वरवंटा उखडून फेकल्यानंतर आता सरकारने नेमलेली नरेंद्र जाधव समिती सुद्धा तत्काळ बरखास्त करावी, तसेच पाचवीपर्यंत कोणतीही तिसरी भाषा नको यासाठी आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीकडून या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आज (7 जुलै) आझाद मैदानात सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार असून यासाठी साहित्यिक, सामाजिक आणि राजकीय पक्षही एकवटणार आहेत. डॉ. नरेंद्र जाधव समिती तत्काळ रद्द करा, बालभारतीची शैक्षणिक स्वायत्तता अबाधित ठेवा, शिक्षण मंत्री दादा भुसे आणि एससी आरटी संचालक राहुल रेखावार यांची तत्काळ हाकालपट्टी करा या प्रमुख मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन केले जाणार आहे.

 आझाद मैदानात सकाळी दहा वाजल्यापासून शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती त्रिभाषा सूत्र विरोधात धरणे आंदोलनाला बसले आहेत. या धरणे आंदोलनाला राजकीय पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, मनसे, भाकप या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सुद्धा या धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत.

नरेंद्र जाधव सरकारधार्जिण असल्याचा आरोप

हिंदी सक्तीचा वरवंटा मागे घेतला, तरी पडद्याआडून महायुती सरकारचा डाव सुरु असल्याची शंका मराठी जणांमध्ये आहे. या संदर्भात अभ्यास करण्यासाठी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. मात्र, नरेंद्र जाधवांचा आजवरचा इतिहास पाहिल्यास ते सरकारधार्जिणे आणि सरकारची भलामण करत असल्याचा आरोप सातत्याने त्यांच्या नियुक्तीपासून होत आहे. नरेंद्र जाधव अर्थ विषयातील जाणकार असल्याने शैक्षणिक क्षेत्रातील संवेदनशील विषयासाठी नेमणूक कशासाठी? असाही सवाल केला जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या मुद्याकडे लक्ष वेधले होते. राज ठाकरे यांनी मराठी जणांमधून होत असलेल्या विरोधाची जाणीव नरेंद्र जाधव यांंना असावी, असा गर्भित इशारा दिला आहे.

आंदोलनात कोण कोण सहभागी होणार?

    हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

    विजय वडेट्टीवार, काँग्रेस

    डॉ.भालचंद्र मुणगेकर

    प्रकाश रेड्डी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष

    डॉ. अजित नवले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

    हेमंत गोखले, माजी न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय

    मीना गोखले

    निखिल वागळे, ज्येष्ठ संपादक

    राजन गवस, ज्येष्ठ साहित्यिक

    सुमीत राघवन, अभिनेता

    युवराज मोहिते

    दीपक राजाध्यक्ष,

    प्रशांत कदम, मुक्त पत्रकार

    वैभव छाया, मिडीया कन्सल्टंट

    वरुण सुखराज, दिग्दर्शक

    पैगंबर शेख, सामाजिक कार्यकर्ते

    सहभागी संस्था

    महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ

    शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर

    आनंद निकेतन, नाशिक

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळ

    आम्ही शिक्षक सामाजिक संस्था

    कायद्याने वागा लोकचळवळ

    युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, महाराष्ट्र

    मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र राज्य

    मराठी बोला चळवळ

    मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत (फेसबुक समूह)

    इंडी जर्नल

    भाषा अशा कशा, यूट्यूब चॅनेल

    भारतीय विवेकवादी व अंधश्रध्दा निर्मूलक

    कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य

    ज्योती सावित्री प्रबोधिनी

    स्वायत्त महाराष्ट्र अभियान

    तोडकं मोडकं नाट्यसंस्था