Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून फसवणुकीचे प्रकार वाढताना दिसत आहे. दुर्गम भागातील नागरिकांच्या बँक खात्यात तीन महिन्यात अकराशे कोटींची उलाढाल झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. धक्कादायक म्हणजे आपल्या खात्यात इतकी रक्कम जमा झालीये, याची माहिती त्यांना माहितीच नव्हती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गावात रोज मजुरी करून पोट भरणाऱ्या मजुकांच्या बँकेत खाते उघडून त्यात मार्च ते जून 2025 या तीन महिन्यात तब्बल 100 कोटींच्या घरात उलाढाल झाली आहे. यवतमाळच्या पांढरकवडा येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये झालेली ही उलाढाल काळा पैसा पांढरा करण्यासाठी झाल्याचा आरोप आहे. चोपण, वाघोली, वसंतनगर, दहेली तांडा या अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

नागरिकांच्या तक्रारीनुसार, मयूर चव्हाण याने आधार कार्ड आणि विविध कागदपत्र घेतले होते. त्यानंतर गावातीलच रहिवाशी किरण राठोड याच्या खात्यात एक कोटी 16 लाख रुपये आले. इतके पैसे पाहून रहिवाशीही विचारात पडला. मात्र काहीच वेळात ही रक्कम दुसऱ्या खात्यात वळती झाल्याची माहिती मिळाली. हा प्रकार माजी नगराध्यक्ष संतोष बोरेल यांना समजताच त्यांनी बँकेकडे विचारणा केली. असाच प्रकार शेकडो खात्यांमध्ये झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पांढरकवडा पोलीसांकडे या प्रकरणी तक्रार दिली मात्र पोलीसही कारवाई करीत नसल्याचा आरोप बोरेल यांनी केला आहे. शिर्डीकरांसह साईसंस्थान कर्मचारी जिल्ह्यातील बड्या व्यापाऱ्यांची कोट्यावधींची फसवणूक. ग्रो मोर इंवेस्टमेंट फायनान्स या कंपनीच्या माध्यमातून आर्थिक रकमेच्या फसवणूकिचा पर्दाफाश. मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून शेकडों नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक. साई संस्थानचे कर्मचारी अनिल रामकृष्ण आहेर यांच्यासह 21 तक्रारदारांनीदिलेल्या फिर्यादीवरून 1 कोटी 65 लाख 4 हजार रुपयांच्या फसवणुकीचा शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल.