Spread the love

यावल / महान कार्य वृत्तसेवा

येथील प्रसाद प्रमोद यावलकर यांनी 2024-25 या शैक्षणिक वर्षात एम.टेक (कॉम्प्युटर सायन्स) पदवी 80 टक्के गुणवत्तेसह संपादन करून यावल शहराच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी हे शिक्षण महाराष्ट्रातील नामवंत शैक्षणिक संस्था गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज, अमरावती येथून पूर्ण केले.

प्रसाद हे ”यावल समाचार”च्या संपादिका सौ. एम. बी. वाणी व सामाजिक कार्यकर्ते तसेच एस कॉमचे सक्रीय सदस्य श्री. बाळकृष्ण वाणी यांचे नातू आहेत. तसेच ते डॉ. निता प्रमोद वाणी यांचे सुपुत्र आहेत, त्यांनी ऐनपूर येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली असून आता त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत. तर यावल समाचार चे व्यवस्थापक प्रमोद वाणी यांचे सुपुत्र आहेत

प्रसाद यांना बालपणापासूनच अभ्यासाची गोडी होती. त्यांनी एम.टेक करण्याचा निर्धार करून सातत्याने मेहनत घेतली. त्यांच्या यशामागे पालकांचे मार्गदर्शन, कुटुंबीयांचे पाठबळ व शिक्षकांचे सहकार्य लाभले. त्यांनी अभ्यासासोबतच संगणक क्षेत्रातील नविन तंत्रज्ञानातही रुची दाखवली असून भविष्यात आयटी किंवा शैक्षणिक क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत होण्याची त्यांची इच्छा आहे.

प्रसाद याच्या या यशामुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून परिसरातील नागरिक, मित्रपरिवार व सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्तींनी त्याचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी अशी उल्लेखनीय आणि गौरवशाली वाटचाल त्यांनी केली आहे.

यावल शहरात अशा गुणवंत विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता येथील शैक्षणिक पातळी उंचावते आहे, हे विशेष. प्रसाद यांना पुढील वाटचालीसाठी ”यावल समाचार” परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा.