Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मुंबईमध्ये सलैंगिक संबंधांमधून निर्माण झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाच्या कोल्ड्रिंकमध्ये विष घालून त्याला संपवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणमध्ये मय मुलाच्या चुलत्याला अटक करण्यात आली आहे.

चुलत काकालाच अटक

शिवाजीनगर पोलिसांनी 16 वर्षीय मुलाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात चुलत काका जिशान शब्बीर अहमद (19) विरोधात गुन्हा नोंदवला आहे. कोल्ड्रिंकमध्ये कथित विषारी पदार्थ मिसळून ते मुलाला पिण्यास देत त्याला जीवे मारल्याचा आरोप जिशानवर ठेवण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार पेटिंगचे काम करणारा मूळचा बिहारचा रहिवासी असलेला आरोपी जिशान हा शिवाजीनगर येथे गेल्या सात महिन्यांपासून भाड्याच्या घरात राहात होता. तक्रारदार नौशाद नसिर शेख (36) हे पत्नी, मुलगी आणि मुलगा शाहिदसोबत राहायचे. त्यांची पत्नी धार्मिक कार्यक्रमासाठी 24 जून रोजी बिहारला गेली होती. त्यानंतर 29 जून रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 11 वाजता फिरायला गेलेला मयत अल्पवयीन मुलगा घरी परतलाच नाही.

तुमचा मुलगा माझ्या घरी बेशुद्ध पडल्याचा फोन

नौशादने त्याचा शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4 वाजता पत्नीने फोन केला आणि त्यांचा अल्पवयीन मुलगा हा आपल्या घरी बेशुद्ध असल्याचे जिशानने कळिवल्याचे तिने सांगितले. नौशादने स्थानिक डॉक्टरांसोबत जिशानचे घर गाठले. डॉक्टरांनी या मुलाचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. नौशाद यांनी विचारणा करताच, तुमचा मुलगा रात्री कोल्ड्रिंक प्यायला. त्यामुळे त्याला त्रास होऊन उलटी झाली आणि तो बेशुद्ध पडल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जात मुलाचाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सुरुवातीला अपमृत्यूची नोंद करून तपास पोलिसांनी सुरू केला.

समलैंगिक संबंधांचा संशय

4 जुलै रोजी मयत मुलाच्या एका मित्राने 29 जूनच्या दुपारी घडलेला प्रकार नौशाद यांना सांगितला. तो, मयत मुलगा आणि एक मित्र रिक्षामध्ये बसून गप्पा मारत असताना या मुलाला जिशानचा फोन आला. तो घाबरून निघत असताना जिशान तेथे आला आणि त्याला तेथून घेऊन गेला. सायंकाळी साडेसहा वाजता हा मुलगा आणि जिशान हे एका रिक्षामध्ये दिसले. या मुलाला कोल्ड्रिंकमुळे त्रास होत असल्याचे सांगून त्याला जिशानने घरी नेल्याचे सांगितले. चार-पाच महिन्यांपूर्वी जिशान या मुलाला नागपूर येथे घेऊन गेला होता. त्यानंतर नौशाद यांनी मुलाला जिशानसोबत फिरण्यास मनाई केली होती. याच रागातून जिशानने या मुलाची हत्या केल्याचा आरोप नौशाद यांनी केला आहे. ही हत्या समलैंगिक संबंधांमधून झाल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामध्ये पोलीस पुढील तपास करत आहेत.