Spread the love

नांदणी मठाचे प.पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी दिला शुभाशीर्वाद

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा (सुभाष भस्मे)

पारदर्शी कारभार आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब यामुळे सन्मती सहकारी मल्टिस्टेट काे-ऑप. बँक अल्पावधीतच जनसामान्यांच्या विश्वासाला पात्र ठरली आहे. जैन धर्माचे चाेवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या पाच नावापैकी सन्मती हे एक नाव आहे. याचा अर्थ चांगली मती, बुद्धी असा हाेताे. सन्मती नावाने सुरू झालेल्या बँकेच्या सर्व सभासद, शेतकरी व्यापारी, उद्याेजक तसेच सर्वांना या बँकेचा भरभरून हातभार लाभाे, बँकेच्या आर्थिक कार्याचा सर्व समाजाला लाभ हाेऊन सर्वांची आर्थिक प्रगती व्हावी, असा शुभाशिर्वाद नांदणी मठाचे प.पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी दिला.

इचलकरंजी येथील सन्मती सहकारी मल्टिस्टेट काे-ऑप. बँकेच्या सांगली शहरातील विजयनगर शाखेचे महावीरनगर येथे स्थलांतर साेहळा नांदणी मठाचे प.पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते व दक्षिण भारत जैन सभा पदवीधर संघटनेचे संस्थापक आर. पी. पाटील-सिदनाळकर, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील, वीराचार्य पतसंस्थेचे अनिल मसुदे, भाऊसाे पाटील,  बाळासाहेब कलशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

प्रारंभी स्वागत करुन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशाेक पाटील यांनी बदलत्या काळानुरूप बँकिंग क्षेत्रातील आवश्यक त्या सर्व अत्याधुनिक सेवा या शाखेर्माफत सभासदांना दिल्या जात असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात चेअरमन सुनिल पाटील यांनी, ग्राहकांचे हित जपणारी आणि गुणवत्तापूर्वक सेवा देणारी बँक म्हणून ओळखली जाते. काेअर बँकिंग सुविधा, आरटीजीएस, एनइएफटी सेवा व एटीएम अशा अनेक सेवा या बँकेर्माफत ग्राहकांना पुरविल्या जात आहेत. बँकेने सहकारी क्षेत्रात गरुडभरारी घेत केवळ काेल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट आणि कर्नाटक राज्यात नावलाैकिक मिळवला आहे. जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातील अग्रगण्य असणाèया या बँकेने लहानांपासून माेठ्यापर्यंत अनेकांना कर्ज पुरवठा करून राेजगार उपलब्ध करुन दिला असल्याचे सांगितले. सांगली शाखाधिकारी विनयचंद्र सुर्यवंशी यांनी आभार मानले.

याप्रसंगी बँकेचे व्हाईस चेअरमन एम. के. कांबळे, संचालक सर्वश्री शितल पाटील, प्रा. प्रद्युम्नकुमार कडाेले, डाॅ. पुरुषाेत्तम कुलकर्णी, विठ्ठल चाेपडे, आण्णासाे मुरचिट्टे, चंद्रकांत पाटील, प्रदीप मणेरे, डाॅ. आप्पासाहेब हाेसकल्ले, संजय चाैगुले, प्रा. आप्पासाहेब पाटील, गिरीष देशपांडे, महावीर यळरुटे, संदीप माळी, साै. वसुंधरा कुडचे, डाॅ. साै. निमा जाधव, मनिष पाेरवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समीर मैंदर्गी, बाेर्ड सेक्रेटरी महेश कुंभार आदी उपस्थित हाेते.