Spread the love

लातूर / महान कार्य वृत्तसेवा

लातूर शहराच्या रिंगरोडवरील एका धाब्यावर वाढदिवस साजरा करताना टिश्यू पेपरवरून दोन गटांमध्ये सुरू झालेला वाद थेट जीवघेणा हल्ला करण्यापर्यंत पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अल्पवयीन मुलाने दारूच्या बॉटलने तोंड ठेचल्याने दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, या गोंधळात अनेक अल्पवयीन तरुणांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नेमका प्रकार काय?

लातूर शहरातील रिंगरोडवरील ढाब्यावर रात्रीच्या वेळी मद्यपींची मोठी गर्दी असते. यातूनच दोन टेबलवर दारू पीत बसलेल्या तरुणांमध्ये भांडण सुरू झाले आणि धाब्यावरील भांडण रस्त्यावर आले. दारूची बॉटल डोक्यात घालून दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना रात्री घडली..ही सर्व हाणामारी मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली.. धक्कादायक बाब ही यात अल्पवयीन मुलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता…

रिंगरोडवरील आठवण धाब्यावर दीपक सूर्यवंशी ( रा. कोंडदेव नगर लातूर) आणि संगमेश्वर काळगे ( रा. खणी लातूर) हे दोघे त्याच्या मित्रांबरोबर दारू पीत आणि जेवण करत बसली होते… त्यांच्या समोरच्या टेबलवर आणखीन काही तरुण बसले होते. वाढदिवसाची पार्टी सुरू होती. वेटरला टिशू पेपर मागण्यात आला.. वेटरला वेळोवेळी जोरात आवाज देण्यात येत होता.. आजू बाजूला बसलेल्या या दोन टेबलवरील तरुणांमध्ये मोठ-मोठ्याने बोलण्यावरून वाद निर्माण झाला. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद थेट रस्त्यावर आला. यामध्ये दीपक आणि संगमेश्वरच्या डोक्यात दोघांनी दारूची बॉटल घातल्याने ते जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

पोलिसांचा तपास सुरु या प्रकारात सहभागी असलेल्यांमध्ये अल्पवयीनांची मोठी संख्या असल्याने पालकांमध्येही चिंता पसरली आहे. रिंगरोडवरील धाब्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत मद्यप्राशन, गोंधळ आणि भांडणे होणे नित्याचे झाले आहे. अनेक युवक, व्यापारी, विद्यार्थी येथे मद्यप्राशनासाठी गर्दी करत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या हिंसक घटनांना वेळोवेळी तोंड द्यावं लागतं.घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील मोठा अनर्थ टळवला. पोलिसांनी मारहाणीचा व्हिडिओ ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.