कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील गडहिंग्लज चंदगड राज्य मार्गावरील शिरपूर तर्फे नेसरीजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गडहिंग्लजचे माजी पंचायत समिती सभापती आनंदराव मटकर यांच्या कारने कारने दुचाकीस्वारांना धडक दिल्याने झाला. या धडकेमध्ये विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर तर आणि एक जखमी आहे. प्रेम संतोष यमेटकर (वय 16) विद्यार्थ्यांचे नाव आहे. रोहित अर्जुन गंडाळे असे गंभीर जखमीचं नाव आहे. दरम्यान अपघातानंतर आनंदराव मटकर फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. दरम्यान राजकीय संबंध असल्याने प्रकरण दाबण्यासाठी राजकीय दबाव वापरत असल्याची चर्चा नेसरी पंचक्रोशीत रंगली आहे.
समोरून येणाऱ्या कारने त्यांच्या बाईकला जोराची धडक दिली
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार प्रेम आणि रोहित मित्राची दुचाकी घेऊन गडिंग्लजला गेले होते आणि सायंकाळी चारच्या सुमारास काम झाल्यानंतर परतेन ते नेसरीकडे जात असतानाच शिप्पूर फाट्याजवळ समोरून येणाऱ्या कारने त्यांच्या बाईकला जोराची धडक दिली. या धडकेमध्ये प्रेम रक्ताच्या थरात पडला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावर झाल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला. रोहित हा गंभीर जखमी झाला. अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये त्याला उपचारासाठी गडहिंग्लजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामध्ये त्यांच्या दुचाकीचा पूर्णत: चक्काचूर झाला. अपघात झाल्यानंतर मटकर फरार झाला होता. मात्र पोलिसांनी मध्यरात्री अटक केली.
बेक फेल होऊन कंटेनर दरीत दरम्यान, बेक फेल झाल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला वाचवण्याच्या नादात कंटेनर दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात चालक व क्लिनर हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी तिलारी घाटातील जयकर पाँईटला हा अपघात घडला. कंटेनर शंभर फूट खोल दरीत कोसळल्यानंतर धडका देत गेल्याने चार तुकडे झाले. प्रसंगावधान राखून चालकाने उडी मारली तर दुसरा बाहेर फेकला गेला. शशीकुमार पी (परमेश्वर आप्पा (वय 40, रा. शिमोगा भद्रावती) व विजय मन गुप्ते (वय 38, रा. अंकली, ता. चिकोडी) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना चंदगड येथे प्राथमिक उपचारानंतर बेळगाव रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
