Spread the love

इचलकरंजी महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त सुरेल जुगलबंदी कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

बासरी आणि सारंगी यांच्या जुगलबंदी कार्यक्रमात पंडित विवेक सोनार आणि उस्ताद साबीर खान यांनी संगीत क्षेत्रामधील विविध राग सादर केले. कार्यक्रमाच्या समारोप करताना रघुपती राघव राजाराम या गीताच्या वादनाने श्रोत्यांना  मंत्रमुग्ध केले. इचलकरंजी महानगर पालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण जून महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

 प्रसिद्ध बासरीवादक पंडित विवेक सोनार व सारंगीवादक उस्ताद साबीर खान तसेच तबला वादक उस्ताद समीर सुर्यवंशी यांच्या जुगलबंदी कार्यक्रमाचे आयोजन श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे करण्यात आले होते. यावेळी इचलकरंजीतील नृत्यांगना सायली होगाडे यांच्या पदन्यास नृत्य कला अकादमीच्या ३० युवती आणि महिला सहकारी नृत्यांगना यांच्या बॉलीवूड थीमवर आधारित जुन्या नव्या हिंदी मराठी सह अन्य भाषेतील गीतांवर आधारीत शास्त्रीय नृत्याने श्रोत्यांना श्रोत्यांना खिळवून ठेवले.

 यावेळी सायली होगाडे यांनी सादर केलेल्या आधा है चंद्रमा रात आधी या गीतांवर केलेल्या नृत्याने तर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला.

कार्यक्रमाचा शुभारंभ  पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून करण्यात आला. यावेळी  उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहा.आयुक्त रोशनी गोडे, सहा आयुक्त विजय राजापुरे, आरोग्य अधिकारी डॉ.सुनीलदत्त संगेवार, महिला बाल कल्याण अधिकारी बेबी नदाफ, भांडार अधिक्षक सुजाता दाभोळे, क्रीडा अधिकारी संजय शेटे यांचेसह महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते.