राधानगरी / महान कार्य वृत्तसेवा
धामोड (ता.राधानगरी) येथील पांडुरंग रामचंद्र चौगुले यांच्या घराची भिंत पावसाने भिजल्याने कोसळली. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या पंधरा दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शनिवारी रात्री जवळपास परिसरात ७० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. यावेळी चौगुले यांची भिंत पावसाने भिजून रविवारी सकाळच्या सुमारास कोसळली. पंचनामा ग्रामपंचायत सदस्य एन.जी.नलवडे , पोलीस पाटील के.डी.इंगवले, तलाठी जीवन कोळी, कोतवाल रूपाली कांबळे, सदाशिव नलवडे यांनी केला.
