तारदाळ / महान कार्य वृत्तसेवा
ग्रामीण कथाकार शंकर पाटील ग्रंथालय यांच्या वतीने तारदाळ मधील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींचा गौरव करून सर्व गौरव मुर्तींना प्रेरणा दिली आहे. हा भावनिक व अनुभव संपन्न कार्यक्रम पाहून मीही भारावून गेलो आहे. असेच गुणवंत विद्यार्थी तारदाळ मधून प्रतिवर्षी घडावेत असाच सांस्कृतिक, साहित्यिक, ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे आवाहन तारदाळ गावचे सुपुत्र सांगली जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी आयोजित सत्कार प्रसंगी कार्यक्रमात केले.
ग्रामीण कथाकार शंकर पाटील ग्रंथालय यांच्या वतीने तारदाळ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता. सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी साजीदा नदाफ या विद्यार्थिनीने सामाजिक कविता सादर केली. इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे अनुष्का कारंडे, श्रेया शिंदे, वेदिका फराकटे, कल्पना शिंदे, नीट परिक्षेत सुजित मगदूम, आदित्य कदम यांनी उत्तम यश मिळवल्याबद्दल व स्पर्धा परीक्षेत ओंकार हिंगमिरे याची विद्युत सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल, अस्मिता वाडेकर हिने वकील परिक्षेत उज्वल यश संपादन केले बद्दल, महाराष्ट्र महिला प्रीमियर लीग मध्ये उत्तम कामगिरी करणारी संजना वाघमोडे तसेच तारदाळचे सुपुत्र सुशांत खांडेकर यांची अप्पर जिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, सरपंच पल्लवी पोवार, के.जी.पाटील, यशवंत वाणी, ग्रंथालयाचे अध्यक्ष यासीन मुजावर आदींनी आपली मनोगत व्यक्त करीत ग्रंथालयाचे व सत्कारमूर्तींचे कौतुक केले. प्रास्ताविक सुचिता कदम यांनी केले. स्वागत आर.डी.शिंदे व सूत्रसंचालन गजानन खोत यांनी केले.
यावेळी माजी सरपंच प्रकाश खोबरे, उपसरपंच मृत्युंजय पाटील, विनोद कोराणे, सचिन पोवार, सुर्यकांत जाधव, प्रविण पाटील, अकबर करडी, धनाजी शिंदे, रमेश नर्मदे, बापू गायकवाड, अशोक गायकवाड, विलास पाटील, श्रीकांत कांबळे, निलेश वाणी, गणेश पाटील, सोनम शिंदे, भाग्यश्री नर्मदे यांच्यासह अनेक मान्यवर व पालक उपस्थित होते. आभार डॉक्टर विजय भगत यांनी मानले.
