इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
दुर्गामाता प्रतिष्ठान व स्वामी समर्थ केंद्र पंचवटी टॉकीज जवळ यांचे मार्फत पंढरपूरला जाणाऱ्या वारकर्यांसाठी 25 हजार भाकरी, शिधा, पाणी, बिस्किटे, पिठले, चिवडा, भडंग, बिस्किटे, राजगिरे लाडू आणी उपवासाचे साहित्य पाठवण्यात आले.
फलटण जवळ असलेल्या बरड गावामध्ये पालखी मार्गावर या साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.साहित्य रवाना करताना भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, संघाचे विभागीय संघचालक भगतरामजी छाबडा, संतोष हत्तीकर, तानाजी रावळ, चंद्रकांत वासुदेव, चंद्रकांत इंगवले, विश्वनाथ मुसळे जयकुमार पटेल चंद्रकांत जासूद बसवराज कलबुर्गी रावसाहेब कदम तात्या पुजारी शाहीर जावळे राजू बर्गे श्रेणिक शिदनाळे सुधाकर कुलकर्णी मीना माने शेटके ताई उपस्थित होते.
