इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
खंजीरे इंडस्ट्रीअल इस्टेट, शहापूर येथे उधारीवर ग्रे कापड खरेदी करून ४० लाख ४ हजार ४२६ ही रक्कम न देता फसवणूक केल्याप्रकरणी इचलकरंजी येथील सौ.शर्वरी शिवराज तारदाळे, शिवराज शंकर तारदाळे (रा.१०/१०७८/०२ माऊलीकृपा महानगरपालीका जवळ राजराजेश्वरी नगर) या दांपत्यावर शहापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुधीर श्रीगोपाल दरगड (वय ४२, रा.इचलकरंजी) यांच्याकडून उधारीवर ग्रे कापड खरेदी करण्यात आले. मात्र, खरेदी केलेल्या कापडाचे पैसे न देता सुमारे ४० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर तपास करीत आहेत.
