महान कार्य इम्पॅक्ट
इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा (सुभाष भस्मे)
पंचगंगा नदीला पूर आल्यास नजीकच्या स्मशानभूमीचा वापर करता न आल्यामुळे नागरिकांना अंत्यसंस्कार करताना अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर शहापूर स्मशानभूमीत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ‘महान कार्य’ ने प्रसिद्धीच्या माध्यमातून केली होती. या मागणीचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून, प्रशासनाने त्वरित हालचाली करत शहापूर स्मशानभूमीला भेट देऊन तेथील असुविधांची पाहणी केली. सोमवार पासून अधिक गतीने येथील कामाला सुरुवात होणार आहे.
शहापूर स्मशानभूमीत सध्या छत, पाण्याची सोय, प्रकाशव्यवस्था तसेच दहन जागा अवस्था अत्यंत निकृष्ट आहे. यामुळे पावसाळ्यात नागरिक आणि त्यांच्या नातेवाइकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषतः पंचगंगा नदीला पूर आल्यावर मुख्य स्मशानभूमीपर्यंत जाणे कठीण होते, त्यामुळे शहापूरसारख्या पर्यायी स्मशानभूमीला सुविधा असणे अत्यंत आवश्यक आहे.
महान कार्यने केलेल्या लक्षवेधी प्रसिद्धीमुळे प्रशासकीय यंत्रणा जागी झाली. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्मशानभूमीची पाहणी करून त्वरित सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. लवकरच या ठिकाणी छत, पाण्याची टाकी, सांडपाण्याची निचरा व्यवस्था शेणकुटे ठेवण्यासाठी असलेल्या खोलीची दुरुस्ती खोलीवरील पत्रे आणि कुंभी काँक्रिटीकरण स्मशान भूमीवरील पत्रे दहन करण्यासाठी वापरले जाणारे तीन बेड लोखंडी गेट आणि नागरिकांना बसण्यासाठीची बाकडी, अशा कामांना सुरुवात होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सामाजिक जनजागृतीमुळे आणि ‘महान कार्य’च्या पुढाकारामुळे हा सकारात्मक बदल घडून आला आहे.
इचलकरंजी बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री. क्षीरसागर यांनी शहापूर स्मशानभूमी येथे भेट देऊन मक्तेदार देशिंगे यांना त्वरित काम सुरू करण्यात यावे, अशा सूचना दिल्या..सामाजिक प्रश्नाची दखल घेऊन आवाज उठवला या बद्दल “महान कार्य” वृत्तसमूहाचे चे अभिनंदन.
-शशिकांत मोहिते, सामाजिक कार्यकर्ते
