Spread the love

इचलकरंज प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी आयोजित ‘रोटरी युवा गौरव पुरस्कार 2024-25’ सोहळा उत्साही  वातावरणात पार पडला. विविध क्षेत्रात चमकदार काम करणाऱ्या युवा गौरवमूर्तींचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी आमदार डॉ.राहुल आवाडे यांना ऑनररी रोटरीयन म्हणून रोटरी पिन  सहायक प्रांतपाल   यतीराज भंडारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. सेक्रेटरी चंद्रकांत मगदूम यांची आदिनाथ बँकेच्या व्हाईस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल तसेच झोनल सेक्रेटरी प्रशांत कांबळे यांना इंटरनॅशनल मेजर डोनर व शाहू पुरस्कार मिळाल्याबद्दल  विशेष सत्कार करण्यात आला.

साउथ आफ्रिका येथील अतिशय कठीण व खडतर अशी काम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धापूर्ण केल्याबद्दल  सचिन बुरसे, डॉ.केतकी साखरपे व आम्रपाल कोहली यांचा गौरव करण्यात आला.

आमदार डॉ.राहुल आवाडे व सहाय्यक प्रांतपाल यतीराज भंडारी यांचे मनोगते झाली.

प्रास्ताविक व स्वागत क्लब अध्यक्ष संतोष पाटील यांनी केले, तर आभार सेक्रेटरी मनीष मुनोत यांनी मानले. व्यासपीठावर क्लबचे सेक्रेटरी चंद्रकांत मगदूम व प्रोजेक्ट चेअरमन अनिल भुतडा उपस्थित होते. या सोहळ्यात अजय हळदे (स्पर्धा परीक्षा), निधी ललवाणी (सीए), घननिल लोढे (योगा), अपूर्वा पाटील (रोल बॉल), ऋषिकेश राऊत (पत्रकारिता), शरद घाटगे (खो-खो), यश शिंदे (कबड्डी) या युवा व्यक्तींचा गौरवमूर्तींचा गौरव करण्यात आला.