Spread the love

कोलंबो / महान कार्य वृत्तसेवा

पहिल्याच कसोटीत बांगलादेशने धावांचा डोंगर श्रीलंकेसमोर उभा केला होता. आता कोलंबो येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवत बांगलादेशला पराभवाची धूळ चारली आहे. श्रीलंकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ेंऊण्) 2025-27 मध्ये पहिला विजय नोंदवला आहे. या विजयासह, ते ेंऊणब पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर आहे. त्यांनी वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या मैदानावर 159 धावांनी हरवून ेंऊणब मध्ये विजयाचे खाते उघडले. इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. लीड्स टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडने भारताचा 5 विकेट्सने पराभव केला. कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये श्रीलंकेने बांगलादेशचा एक डाव आणि 78 धावांनी पराभव केला आणि मालिका 1-0 ने जिंकली. गॅलेमध्ये खेळलेला पहिला टेस्ट सामना अनिर्णित राहिला.

कोलंबो येथे बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने एक डाव आणि 78 धावांनी विजय मिळवला. चौथ्या दिवशी फक्त 28 मिनिटांत उरलेले शेवटचे चार विकेट घेत श्रीलंकेने सामना जिंकला आणि दोन सामन्यांची मालिका 1-0 अशी जिंकली. या विजयासह श्रीलंकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद (ेंऊण्) मध्ये महत्वाचे गुण देखील मिळवले.

कोलंबो कसोटीच्या पहिल्या डावात 247 धावा करणारा बांगलादेश संघ दुसऱ्या डावात फक्त 133 धावांवर गारद झाला. संघाचा यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने सर्वाधिक 26 धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त कोणताही फलंदाज क्रीजवर टिकू शकला नाही. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्याने सर्वाधिक 5 बळी घेतले. कर्णधार धनंजय डी सिल्वा आणि थरिंदू रत्नायके यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. असिता फर्नांडोने एक बळी घेतला. बांगलादेशच्या चार फलंदाजांना दुहेरी अंकही गाठता आला नाही.

त्याआधी, श्रीलंकेने पहिल्या डावात 458 धावा करून 211 धावांची आघाडी घेतली. सलामीवीर पथुम निस्सांकाने शानदार फलंदाजी केली आणि सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावले. त्याने 254 चेंडूत 19 चौकारांच्या मदतीने 158 धावा केल्या. याआधी, निस्सांकाने गॅले कसोटीच्या पहिल्या डावात 187 धावा केल्या होत्या. त्याच्या शानदार खेळीसाठी त्याला सामनावीर आणि मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.

निसांका व्यतिरिक्त, अनुभवी फलंदाज दिनेश चंडिमलने 93 धावांचे योगदान दिले, तर कुसल मेंडिसने 84 धावांचे योगदान दिले. कामिंदू मेंडिसने 33 धावा केल्या तर यष्टिरक्षक फलंदाज लाहिरू उदाराने 40 धावांचे योगदान दिले. बांगलादेशकडून तैयल इस्लामने सर्वाधिक 5 बळी घेतले, तर नैम हसनने तीन बळी घेतले. तत्पूर्वी, बांगलादेशचा पहिला डाव 247 धावांपर्यंत मर्यादित राहिला. पहिल्या डावात सलामीवीर शादमान इस्लामने सर्वाधिक 46 धावा केल्या. मुशफिकुर रहीमने 35 धावांची खेळी केली