चंद्रकांत कोष्टी यांचे पालिकेला पत्र
इचलकरंजी विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
आप्पासाहेब तांबे याने केलेल्या सि.स.नं. ९७५९ वरील अतिक्रमण काढून घेतलेल्या जागेचे भुईभाडे वसुल करुन त्यांच्या विरूध्द भारतीय कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कोष्टी यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आता पहावे लागेल, आयुक्त या पत्रावर काय निर्णय घेतात.
सि.स.नं. ९७५९ वरील जागा ही चिल्ड्रेन प्ले ग्राऊन्डसाठी आरक्षित असलेली जागा गेली २५ वर्षे आप्पासो रामचंद्र तांबे यांनी विनापरवाना, विनाभुईभाडे, कोणतेही भाडे न देता वापरत होते. त्याची तक्रार वारंवार केल्यानंतर २३ जून रोजी ती जागा ताब्यात घेतली आहे. परंतु तांबे यांचे विरुध्द कोणतीही कार्यवाही केलेली नाही किंवा त्यांचेकडून कोणतीही कर आकारणी केलेली नाही. असे पत्रातून कोष्टी यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
इचलकरंजी शहरातील मिळकत धारकांकडून प्रतीवर्षों कर आकारणी करता व कर न भरलेस त्यांच्यावर आपण दंडव्याज आकारणी करता. शहरातील फिरत्या फेरीवाल्यांकडून आपण दररोज कर आकारणी करुन कर वसुल केला जातो. गोरगरीब छोटे व्यापारी शुक्रवार व मंगळवार बाजारात बसतात. त्या भाजी विक्रेत्यांकडून कर आकारणी केली जाते.
इचलकरंजी शहरात वेगवेगळ्या प्रकारे सर्वांकडून कर आकारणी केली जाते. तर श्रध्दा अकॅडमीचे मालक व चालक आप्पासाहेब रामचंद्र तांबे व इतर हे आतापर्यंत गेली २५ वर्षे १४ गुंठ्याची जागा विनापरवाना, विनाकर, कर न भरता ते वापरात होते. त्यांच्याकडून १४ गुंठ्याच्या जागेची रोजची आकारणी करुन त्यांचेकडून २३ जून पर्यंत म्हणजेच ९ हजार १२५ दिवसांची कर आकारणी करुन त्यावर दंड आकारणी करावी व आप्पासो रामचंद्र तांबे व इतर यांच्याविरुध्द भारतीय कायद्यातील तरतुदीनुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चंद्रकांत कोष्टी आणि पत्रात केली आहे.
अन्यथा उच्च न्यायालयात जाणार
महापालिकेने पंधरा दिवसात या संदर्भात कार्यवाही न केल्यास महापालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
– चंद्रकांत बाळासाहेब कोष्टी
