Spread the love

नृसिंहवाडी / महान कार्य वृत्तसेवा

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिण व्दार सोहळा २५ जून बुधवारी दुपारी एक वाजता संपन्न झाला. या दक्षिण व्दार सोहळ्यामध्ये अनेक भाविकांनी पुण्य स्नान केले.

उसंत घेतलेल्या पावसाने कोयना व वारणा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा हजेरी लावल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली आहे. आज २५ जून बुधवार दुपारी एक वाजता चालू सालातील पहिला दक्षिण व्दार सोहळा संपन्न झाला. भाविकांनी दिगंबरा दिगंबराच्या व श्री गुरुदेव दत्त च्या गजरात दक्षिणव्दार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला.

भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान मार्फत जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. दरम्यान श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी प.प.श्री नारायण स्वामी यांचे मंदिरात ठेवण्यात आली आहे. नृसिंहवाडी व औरवाड यांना जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेला आहे.