रुकडी / महान कार्य वृत्तसेवा
शालेय परिसर तंबाखूमुक्त ठेवण्याची जबाबदारी आता मुख्याध्यापकावर सोपविण्यात आली आहे. संजय घोडावत विद्यापीठात ‘तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न शाळा’ प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले.
‘आम्ही सर्व आहोत कटिबद्ध महाराष्ट्राच्या नव्या पिढीला व्यसनमुक्त आणि आरोग्य संपन्न बनविण्यासाठी’ हा उपक्रम सलाम मुंबई फाऊंडेशनच्या वतीने राबवण्यात येत आहे. या प्रशिक्षण वर्गात हातकणंगले तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी अजय बिरंगे यांनी केले. यावेळी तज्ञ मार्गदर्शक रवी कांबळे यांनी ३०० यार्डपर्यंत शालेय परिसर तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी नऊ निकष ठरवले आहेत. व त्यांची अंमलबजावणी मुख्याध्यापकांनी करायची आहे. हे नऊ निकष पूर्ण झाल्याचे पुरावे व फोटो’ टोबॅको फ्री स्कूल ॲप’ वरती अपलोड करायचे आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शाळेला तंबाखू मुक्त शालेय परिसर असे प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना शालेय कामकाजांबरोबर शालेय परिसर तंबाखूमुक्त ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आभार रूकडी केंद्राचे केंद्रप्रमुख शशिकांत पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी प्रकाश नलवडे, प्राचार्य डी.एस.घुगरे, राजमोहन पाटील, अनिल चव्हाण, अर्जुन पाटील, चमन शेख, गजानन कोल्हे, सागर पाटील, अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.
