प्रतिनिधी/महान कार्य वृत्तसेवा
सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योजकांचा २०१५ पासून प्रलंबित बांधकाम परवाना व व्याज अनुदानाचा प्रश्न मार्गी लावलेबद्दल इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांचा दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन आणि शहर व परिसरातील यंत्रमाग उद्योजकांच्या तर्फे सत्कार करणेत आला.
आमदार आवाडे यांनी या विषयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करून मिटींगचे मिनिट्स व त्यानंतर शासन निर्णय निर्गमीत करून घेतल्यामूळे फक्त आज कोल्हापूर जिल्ह्यातील ४०० वर यंत्रमाग उद्योजक व इतर उद्योजकांचा प्रश्न मार्गी लागला आहे. याबद्दल दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्व उद्योजकांच्या वतीने आमदार राहुल आवाडे यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.
यावेळी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे उपाध्यक्ष रफिक खानापूरे, प्रकाश मोरे, असोसिएशनचे संचालक सतीश कोष्टी, चंद्रकांत भोपळे, पांडूरंग सोलगे, सुभाष बलवान, किरण पोवार, राजाराम गिरी, सि.ए.महेश पोतदार, सि.ए. गौरव गोंदकर, सि.ए. सुभाष चौगुले, उद्योजक गजानन होगाडे, दिनकर अनुसे, नामदेव कांबळे, निलेश हावळ, दयानंद छप्रे, अमोल कनवाडे, श्रीकांत टेके, सुरेश आमाशे, नागेश बोनगे, रोहित मेटे, खलील मैंदर्गी, सुशांत कलागते यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
