इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
डीकेटीई सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकने अभियांत्रिकी शिक्षणातील गुणवत्ता सिद्ध करत नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन (एनबीए) कडून सर्व अभ्यासक्रमांसाठी पुन्हा एकदा तीन वर्षांसाठी मान्यता मिळवली आहे.
सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या सर्व शाखांना एन.बी.ए.चे मानांकन मिळाले आहे. ही मान्यता मिळवण्यासाठी टिचिंग-लर्निंग प्रक्रिया, संशोधन, विद्यार्थ्यांचे यश, करिअर मार्गदर्शन, प्लेसमेंट, आधुनिक सुविधा, विभागीय दस्तावेजीकरण आणि आऊटकम बेस्ड एज्युकेशन यांचे व्यापक मूल्यमापन करण्यात आले होते.
या यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे, प्राचार्य प्रा.अभिजीत कोथळी, उपप्राचार्य व समन्वयक प्रा. बी.ए.टारे, संस्थेच्या संचालिका डॉ. एल. एस. आडमुठे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.
